मुंबई : (Mumbai International Film Festival) मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) २०२६ च्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषेतील निवडक १९ लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सवाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गुरुवारी दाखवण्यात आलेल्या ब्रह्मकमळ- लघुपट, गढूळ- लघुपट, डीयर 202- लघुपट, 17 वे वर्ष- लघुपट, फड- माहितीपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती. याप्रसंगी माहितीपट आणि लघुपटातील उपस्थित लेखक-दिग्दर्शकांना महामंडळाच्या वित्तीय सल्लागार मुख्य लेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू रावराणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘मायबाचे आशीर्वाद’, ‘मेतकूट’, ‘नेहमीच’ हे लघुपट तसेच ‘फड’ या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतरच्या प्रदर्शनांनाही चित्रपट रसिक, विद्यार्थी, अभ्यासक आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातील मान्यवराकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध विषयांवरील संवेदनशील मांडणी, आशयघन कथा आणि उत्कृष्ट चित्रभाषेमुळे प्रेक्षकांकडून या चित्रपटांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.(Mumbai International Film Festival)
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.