इतिहास कट्ट्यावर ‘सातवाहन’ साम्राज्याचा वेध

    10-Jun-2026   
Itihas Katta Mumbai
 
मुंबई : (Itihas Katta Mumbai) भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत, बोरीवली भाग, बोरीवली सांस्कृतिक केंद्र आणि जनसेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इतिहास कट्टा’ उपक्रमांतर्गत ‘एक होता राजा’ मालिकेतील गोष्ट सातवी, ‘सातवाहन – भाग १’ या विषयावरील व्याख्यान रविवार दि. १४ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता वनविहार उद्यान, एक्सर, बोरीवली (प.) येथे होणार आहे.
 
हेही वाचा :  मराठी अस्मितेचा वैश्विक गौरव! इस्रायलमध्ये झळकणार छत्रपती शिवरायांचे स्मारक
 
पुरातत्त्वज्ञ व इतिहास अभ्यासक डॉ. सूरज पंडित या व्याख्यानात सातवाहन राजघराण्याचा उदय, राज्यविस्तार, व्यापार तसेच दख्खनच्या सांस्कृतिक जडणघडणीत त्यांच्या योगदानाचा आढावा घेणार आहेत. इतिहासप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.(Itihas Katta Mumbai)
 
 
 




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर