'काहीही झालं तरी मायदेशी परतणारच!' शेख हसीनांचा आक्रमक पवित्रा!

 
Sheikh Hasina Bangladesh Return 2026
 
नवी दिल्ली (Sheikh Hasina Bangladesh Return 2026) : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. 'काहीही झालं तरी मी मायदेशी परतणारच', असा ठाम पवित्रा घेत त्यांनी बांगलादेशात परतण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. डिसेंबर २०२६ मध्ये बांगलादेशात परतण्याची त्यांची योजना असून, त्यासाठी त्यांनी नवीन पासपोर्ट जारी करण्याची मागणी केली आहे.
 
शेख हसीना यांच्या वकिलांनी सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी लंडनस्थित बांगलादेशच्या सर्वोच्च राजदूतांना ईमेलद्वारे पत्र पाठवले आहे. या पत्रात हसीना यांचा नवीन बांगलादेशी पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्र जारी करण्याची विनंती करण्यात आली आहे. हा पत्र नवी दिल्लीतील बांगलादेश दूतावासामार्फत सादर करण्यात आला आहे. त्यांची बांगलादेशी नागरिक म्हणून असलेली ओळख आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांशी संबंधित तरतुदींचा आधार घेत ही मागणी करण्यात आली आहे. (Sheikh Hasina Bangladesh Return 2026)

बांगलादेश सरकारने रद्द केले होते पासपोर्ट आणि ओळखपत्र!
 
शेख हसीना यांच्या सहकाऱ्यांनी नवीन पासपोर्ट आणि ओळखपत्र मिळवण्याच्या मागणीला मायदेशी परतण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हसीना यांची यापूर्वीची ओळखपत्रे आणि पासपोर्ट सरकारकडून रद्द करण्यात आले होते. त्यामुळे आता त्यांना बांगलादेशी नागरिक म्हणून आपले हक्क पुन्हा मिळवायचे आहेत. (Sheikh Hasina Bangladesh Return 2026)
 
ऑगस्ट २०२४ मध्ये सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर तत्कालीन अंतरिम सरकारने त्यांचा राजनयिक पासपोर्ट रद्द केला होता. त्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये सामान्य पासपोर्टही रद्द करण्यात आला. एप्रिल २०२५ मध्ये निवडणूक आयोगाने त्यांचे राष्ट्रीय ओळखपत्रही गोठवले होते.

शेख हसीना यांना‘फरार दहशतवादी’ संबोधले!
 
बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हुमायून कबीर यांनी शेख हसीना यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना ‘फरार दहशतवादी’ संबोधले. शेख हसीना यांना भारतातून बांगलादेशात परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारत आणि बांगलादेश यांच्यात प्रत्यार्पण करार अस्तित्वात असून, त्याअंतर्गत हसीना यांना बांगलादेशच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी कबीर यांनी केली. (Sheikh Hasina Bangladesh Return 2026)
 
शेख हसीना यांना सुनावली होती मृत्युदंडाची शिक्षा!
 
शेख हसीना यांच्या मायदेशी परतण्याच्या निर्णयासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्यांच्यावरील न्यायालयीन खटले. ढाका येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने १७ नोव्हेंबर २०२५ रोजी २०२४ मधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक कारवाईप्रकरणी त्यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून अनुपस्थितीत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. (Sheikh Hasina Bangladesh Return 2026)
 
न्यायालयाने आंदोलकांवरील कारवाईचे आदेश देण्यात हसीना यांची भूमिका असल्याचे नमूद केले होते. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, जुलै-ऑगस्ट २०२४ मधील आंदोलन दडपण्याच्या कारवाईत सुमारे १ हजार ४०० लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, हसीना यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून, न्यायालयाचा निकाल राजकीय सूडबुद्धीतून देण्यात आल्याचा दावा केला आहे.
 
आरक्षणाविरोधातील विद्यार्थी आंदोलनामुळे गेले होते सत्तेवरून पायउतार!
 
बांगलादेशमध्ये जून २०२४ मध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात विद्यार्थी आंदोलनाला सुरुवात झाली होती. १९७१ च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना आणि नातवंडांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. (Sheikh Hasina Bangladesh Return 2026)
 
सरकारी नोकऱ्यांमधील भरती आरक्षणाऐवजी गुणवत्तेच्या आधारावर व्हावी, अशी आंदोलकांची मागणी होती. जुलै महिन्यात हे आंदोलन अधिक तीव्र झाले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचा आणि अतिरिक्त बळाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला. (Sheikh Hasina Bangladesh Return 2026)
 
त्यानंतर आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली. हे आंदोलन हळूहळू देशभर पसरले. अखेर ५ ऑगस्ट २०२४ रोजी हजारो आंदोलकांनी ढाकामध्ये मोर्चा काढत हसीना यांच्या सरकारी निवासस्थानाला घेराव घातला. त्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत बांगलादेश सोडला आणि त्या लष्करी विमानाने भारतात दाखल झाल्या.
 
आता तब्बल दोन वर्षांनंतर शेख हसीना यांनी पुन्हा मायदेशी परतण्याची तयारी सुरू केली आहे. नवीन पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्रासाठी केलेली मागणी ही त्याच दिशेने टाकलेली महत्त्वाची पायरी मानली जात आहे. (Sheikh Hasina Bangladesh Return 2026)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर