अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केली हत्या; मुख्य आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये केला खात्मा!

 
Raiganj Minor Girl Murder Accused Encounter
 
कोलकाता (Raiganj Minor Girl Murder Accused Encounter) : पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील रायगंज येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. दिलीप राय असे या आरोपीचे नाव असून, सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी बंगाल-बिहार सीमेवरील परारपुकूर घाट परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान ही घटना घडली.
 
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अटकेसाठी गेलेल्या पथकावर आरोपीने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला.आरोपीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (Raiganj Minor Girl Murder Accused Encounter)
 
बंगाल-बिहार सीमेवर पोलिसांची छापेमारी
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे रायगंज पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी सकाळी बंगाल-बिहार सीमेवरील परारपुकूर घाट परिसरात छापेमारी केली. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दिलीप राय या भागात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (Raiganj Minor Girl Murder Accused Encounter)
 
पोलिसांना पाहताच आरोपीचा गोळीबार
 
पोलिसांचे वाहन घटनास्थळी पोहोचताच आरोपीने पथकावर गोळीबार सुरू केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या गोळीबारात पोलिसांच्या वाहनाच्या टायरलाही गोळी लागून वाहनाचे नुकसान झाले. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. यात दिलीप राय गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रायगंज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (Raiganj Minor Girl Murder Accused Encounter)
 
या घटनेनंतर बंगाल-बिहार सीमेवरील परिसरात खळबळ उडाली असून, रायगंज पोलीस संपूर्ण घटनाक्रमाचा तपास करत आहेत.
 
तीन दिवसांनंतर जंगलात आढळला होता मुलीचा मृतदेह
 
गुरुवार, दि ५ नोव्हेंबर रोजी रायगंजमधील अब्दुलघाटा जंगल परिसरात बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मुलीच्या कुटुंबीयांनी रायगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. (Raiganj Minor Girl Murder Accused Encounter)
 
३ नोव्हेंबरपासून मुलगी होती बेपत्ता
 
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी ३ नोव्हेंबरपासून बेपत्ता होती, तर ५ नोव्हेंबर रोजी तिचा मृतदेह आढळून आला. तपासादरम्यान तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी मोहीम तीव्र केली होती. (Raiganj Minor Girl Murder Accused Encounter)
 
स्थानिकांकडून पोलिसांच्या कारवाईचे कौतुक
 
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे. हिंदू जागरण मंचचे संयोजक सौमित्र दे यांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले. महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप करत अशा प्रकरणांत कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
 
तसेच, मुलीची हत्या झाल्यानंतरही आरोपीने तिच्या वडिलांकडून तिला शोधून परत आणण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात पोलिसांवर मोठा दबाव होता, मात्र त्यांनी तत्परतेने कारवाई करत मुख्य आरोपीपर्यंत पोहोचल्याचे सौमित्र दे यांनी सांगितले. त्यांनी पोलिसांसह या प्रकरणात सहकार्य करणाऱ्या खासदारांच्या भूमिकेचेही कौतुक केले. (Raiganj Minor Girl Murder Accused Encounter)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर