'सीमेवर तैनात जवान म्हणजे देशाच्या सुरक्षेचे दिवे'; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सिक्कीममध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी!

 
Rajnath Singh Diwali in Sikkim
 
गंगटोक (Rajnath Singh Diwali in Sikkim) : देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असताना केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सिक्कीममध्ये भारतीय लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी शेरथांग युद्ध स्मारकाला भेट देत देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांना आदरांजली वाहिली. तसेच, शहीद जवानांच्या स्मरणार्थ उभारलेली स्मारके ही देशाप्रती असलेले कर्तव्य आणि त्यागाची सतत आठवण करून देत असतात, असे प्रतिपादन त्यांनी केले.
 
राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत शहीद जवानांच्या शौर्याला अभिवादन केले. ते म्हणाले की, "आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सिक्कीममधील शेरथांग युद्ध स्मारक येथे मी आपल्या अमर शूरवीरांना आदरांजली वाहिली. असे म्हटले जाते की, 'स्मारके मृतांसाठी नव्हे, तर जिवंतांसाठी असतात.' ही स्मारके आपल्याला सतत प्रेरणा देतात आणि आपल्या मनात राष्ट्रीय अभिमान जागृत करतात. कर्तव्य बजावताना त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान कृतज्ञ राष्ट्राच्या स्मरणात कायम कोरलेले राहील. त्यांच्या शौर्याप्रती आपण सदैव ऋणी राहू." (Rajnath Singh Diwali in Sikkim)
 
जवान म्हणजे देशाच्या सुरक्षेचे दिवे!
 
यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दुर्गम आणि आव्हानात्मक सीमावर्ती भागात तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांशी संवाद साधला. प्रतिकूल हवामान आणि कठीण भौगोलिक परिस्थितीतही देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र दक्ष असलेल्या जवानांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. (Rajnath Singh Diwali in Sikkim)
 
याबाबत त्यांनी म्हटले की, "या दुर्गम आणि आव्हानात्मक सीमावर्ती भागात तैनात असलेल्या आपल्या शूर जवानांची भेट घेण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा सन्मान मला मिळाला. आपले जवान दिव्यांसारखे आहेत. ते शांतपणे अंधाराशी लढतात आणि देशातील प्रत्येक घरापर्यंत सुरक्षेचा प्रकाश पोहोचवतात. अत्यंत प्रतिकूल हवामान आणि कठीण भौगोलिक परिस्थितीतही त्यांची अविचल सतर्कता, अथांग देशभक्ती आणि उच्च मनोबल हजारो दिव्यांपेक्षाही अधिक तेजाने प्रकाशमान असते." (Rajnath Singh Diwali in Sikkim)
 
जवानांसोबत दिवाळी साजरी करणे अभिमानाची बाब!
 
राजनाथ सिंह यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, "मातृभूमीच्या खऱ्या रक्षकांसोबत दिवाळी साजरी करणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. सीमेवर सेवा बजावणाऱ्या आपल्या सर्व शूर जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे जीवन सुख-समृद्धीने भरलेले असो."
 
दरम्यान, देशाच्या सीमेवर भारतीय जवान अहोरात्र पहारा देत असल्यामुळेच देशातील नागरिक सण-उत्सव आनंदाने साजरे करू शकतात आणि शांततेत झोपू शकतात, असेही राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी जवानांच्या शिस्तीचे, समर्पणाचे आणि बलिदानाचे विशेष कौतुक केले. (Rajnath Singh Diwali in Sikkim)





मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर