मुंबई (Kirit Somaiya Demography Committee Mumbai) : मुंबईची लोकसंख्या रचना बदलत असल्याचा दावा करत भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारकडे विशेष डेमोग्राफी समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. 'मुंबईला मुस्लीम मुंबई होण्यापासून वाचवण्यासाठी डेमोग्राफी संतुलन समिती स्थापन करावी', अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
सोमय्या यांनी पोस्टद्वारे, मुंबईतील हिंदू आणि मुस्लिम बालकांच्या जन्माची आकडेवारी मांडली. त्यांच्या दाव्यानुसार, २०२५ मध्ये मुंबईत ७० हजार ३८० हिंदू बालकांचा, तर ४८ हजार ५५४ मुस्लिम बालकांचा जन्म झाला. गेल्या पाच वर्षांत ३ लाख ३६ हजार ६२५ हिंदू बालकांचा आणि २ लाख २० हजार ७५४ मुस्लिम बालकांचा जन्म झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या आकडेवारीनुसार हिंदू आणि मुस्लिम बालकांच्या जन्माचे प्रमाण ३:२ असल्याचा दावा त्यांनी केला.(Kirit Somaiya Demography Committee Mumbai)
आपल्या पत्रात त्यांनी १ जानेवारी २०२२ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीतील आकडेवारीही दिली आहे. या काळात मुस्लिम मातांनी तीन किंवा त्यापेक्षा अधिक अपत्यांना जन्म दिल्याची संख्या ५७ हजार ३२९, तर हिंदू मातांची ही संख्या ३० हजार ३७४ असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
सोमय्या यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या मुंबईतील बेकायदा स्थलांतरितांवरील कथित अंतरिम अहवालाचाही संदर्भ दिला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार, १९६१ मध्ये मुंबईत हिंदू लोकसंख्या ८८ टक्के आणि मुस्लिम लोकसंख्या आठ टक्के होती. २०११ मध्ये हे प्रमाण अनुक्रमे ६६ आणि २१ टक्क्यांवर आल्याचा दावा करण्यात आला आहे. २०५१ पर्यंत हिंदूंचे प्रमाण ५४ टक्क्यांपेक्षा कमी आणि मुस्लिमांचे प्रमाण सुमारे ३० टक्के होण्याचा अंदाजही या दस्तऐवजात नमूद आहे.(Kirit Somaiya Demography Committee Mumbai)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक