मुंबई (Sharad Pawar Health Update): उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
शरद पवार हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान, विविध राजकीय नेत्यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “शरद पवार यांना मी रुग्णालयात भेटून आलो. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. माझी डॉक्टरांशीही चर्चा झाली. पवारसाहेबांची तब्येत आता उत्तम आहे. त्यांना उद्या डिस्चार्जही होईल. चिंता करण्याचे कारण नाही. डॉक्टरांनीही उद्या डिस्चार्ज होईल असे सांगितले आहे." (Sharad Pawar Health Update)
राजकीय भेट नाही
ते पुढे म्हणाले की, "ही राजकीय भेट नव्हती. महाराष्ट्रातील एखादा ज्येष्ठ नेता रुग्णालयात असतो तेव्हा त्यांना भेटण्यामागे राजकीय हेतू नसतो. राजकारणापलिकडेही काही नाती असतात, ती जपण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. पवार साहेबांचे आणि माझे संबंध राजकारणापुरते मर्यादित नाहीत. पवार साहेबांशी चर्चा झाली. ते कधीही काही प्रश्न असतील तर मला फोन करतात, आमचे कौटुंबिक संबंध आहेत." (Sharad Pawar Health Update)
दुष्काळावरही चर्चा
“शरद पवार यांनी यावेळी दुष्काळी दौऱ्यावरही चर्चा केली. ते दुष्काळाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील दिसले. त्यांनी साताऱ्यातील दुष्काळाच्या परिस्थितीबाबतही माझ्याकडे चौकशी केली. पाण्याची काय परिस्थिती आहे याबाबतही त्यांनी मला विचारले. दुष्काळ दौरा करत असतानाच त्यांना इन्फेक्शन झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे," असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. (Sharad Pawar Health Update)
मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.