मुंबई (MSRTC NCMC Smart Card): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ केवळ महिला सवलतधारकांना देण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाच्या माध्यमातून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थ्यांची कार्ड नोंदणी अद्याप अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री महोदयांकडून करण्यात आलेल्या विनंत्या व सूचनांचा सकारात्मक विचार करून अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. (MSRTC NCMC Smart Card)
एका विशेष मोहिमेद्वारे दि.३१ डिसेंबर २०२६पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांची १०० टक्के एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने निश्चित केले आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतींच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे. विशेष नोंदणी मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत एनसीएमसी स्मार्ट कार्ड पोहोचविण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. (MSRTC NCMC Smart Card)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.