धनत्रयोदशीला शेअर बाजार आठ महिन्यांच्या उच्चांकावर!

    06-Nov-2026   
 
Stock Market Dhanteras Rally
 
मुंबई (Stock Market Dhanteras Rally): दीपावलीनिमित्त धनत्रयोदशीच्या मुर्हूर्तावर शेअर बाजारात तुफान खरेदी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक एनएसई आठ महिन्यांच्या उच्च स्तरावर बंद झाला. बँकींग आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गडगडणाऱ्या शेअर बाजाराला काहिसा दिलासा मिळाला आहे.
 
दिवसअखेर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक १७१८.०१ अंकांनी उसळून ८१ हजार २८.०२ वर बंद झाला. हा गेल्या आठ महिन्यातील सर्वोच्च स्तर आहे. तर निफ्टी ५०मध्ये ४९३.७५ अंकांची वाढ नोंदविण्यात आली. निफ्टी दि. २७ फेब्रुवारी २०२६नंतर पहिल्यांदाच २५ हजारांच्या वर बंद झाला. यापूर्वी याच वर्षी २७ फेब्रुवारी त्याने हा उच्चांक गाठला होता.  (Stock Market Dhanteras Rally)
 
कुठल्या शेअर्समध्ये तेजी?
 
बँकींग आणि वित्तीय संस्थांच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. सेन्सेक्समध्ये महिंद्रा आणि महिंद्राचा शेअर ६.१५ टक्क्यांनी वधारला. त्यानंतर आयसीआयसीआय बँकेचा शेअर ४.६५ टक्के, एचडीएफसी बँक शेअर ३.५६ टक्के, टायटन ३.३६ टक्के आणि एक्सिस बँक शेअर ३.१९ टक्क्यांनी वधारला. त्याशिवाय कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, सन फार्मा, लार्सन अँड टुब्रो आणि भारती एअरटेलचे शेअर वाढीसह बंद झाले.  (Stock Market Dhanteras Rally)
 
 




तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

संबंधित मजकूर