औरंगजेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सहर शेखविरोधात मुंब्र्यात भाजप युवा मोर्चाचा संताप!

Sahar Shaikh Aurangzeb Birthday Post Controversy AIMIM नगरसेविकेच्या सोशल मीडिया पोस्टवरून राजकीय वातावरण तापले; पोस्टर आणि छायाचित्रांना चपलांनी तुडवत करत निषेध

    05-Nov-2026
 
Sahar Shaikh Aurangzeb Birthday Post Controversy
 
ठाणे (Sahar Shaikh Aurangzeb Birthday Post Controversy) : मुघल शासक औरंगजेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याचे उदात्तीकरण करणारी सोशल मीडिया पोस्ट केल्याने मुंब्र्यातील AIMIM नगरसेविका सहर शेख च्या विरोधात मुब्र्यामध्येच संतापाची तीव्र लाट पसरली आहे. तिने अकलेचे जे तारे तोडलेत त्याने मुंब्रा वासीय संतप्त झाले असून या पोस्टविरोधात भाजप युवा मोर्चाने मुंब्र्यात जोरदार आंदोलन करत संताप व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी AIMIM चे पोस्टर आणि सहर शेख यांच्या छायाचित्रांना चपलांनी मारहाण करत निषेध नोंदवला. सहर शेखच्या प्रभागातच पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. या निषेधात भाजप महिला मोर्चानेही सहभाग घेत सहर शेख यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना ठाणे महापालिकेत प्रवेश करू देणार नाही, असा आक्रमक इशारा दिला.
 
सहर शेख प्रभागात कोणतेही काम करताना दिसत नाही ती केवळ सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये आणि पोस्ट करून चर्चेत राहते. लोकांनी नगरसेवक म्हणून विकासकामे आणि नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडून दिले आहे. मात्र, त्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विषय उपस्थित केले जात असल्याची टीका भाजयुमो ने केली. मुंब्र्यात सर्व धर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. अशा परिस्थितीत सोशल मीडियावरील पोस्टमधून शहरातील शांततापूर्ण वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी सुनावले. (Sahar Shaikh Aurangzeb Birthday Post Controversy)

औरंगजेबाला महाराजांपेक्षा मोठे ठरवण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही
 
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पराक्रमासमोर औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा कोणालाही अधिकार नाही. सहर शेख असो किंवा ओवेसी, कोणालाही महाराजांना दुय्यम ठरवता येणार नाही, असा सज्जड दम युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. औरंगजेबावर एवढेच प्रेम असेल तर अफगाणिस्तानात जावे, अशा शब्दांत संतप्त कार्यकर्त्यांनी सहर शेख ला सुनावले .
 
सहर शेख च्या छायाचित्राला जोडे मारून पायदळी तुडवण्यात आला आणि AIMIM चा झेंडा जाळून मुंब्र्यात आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. (Sahar Shaikh Aurangzeb Birthday Post Controversy)
 
महिला मोर्चाचीही आक्रमक भूमिका
 
भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनीही सहर शेख च्या पोस्टचा तीव्र शब्दांत निषेध केला. औरंगजेबाने अनेक धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली, महिलांवर अत्याचार केले आणि छत्रपती संभाजी महाराजांना बंदी बनवून मृत्युदंड दिला. अशा औरंगजेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे निषेधार्ह असल्याचे महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटले. तरुणांनी अशा नेत्यांच्या वक्तव्यांपासून सावध राहावे आणि इतिहासाचा अभ्यास करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
 
एकीकडे भाजप सहर शेख विरोधात आक्रमक झालेली असताना दुसरीकडे हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या आणि धर्मवीर आंनद दिघे यांचा वारसा सांगणाऱ्या शिवसनेन मात्र यबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सहर शेख चे वडील युनूस शेख शिवसनेना केबल संघाटनेचा पदाधिकारी असल्याने बहुदा शिवसेनेची अडचण होत असावी अशी खोचक टिपणी भाजपचे स्थानिक पदाधिकारी करत आहेत. (Sahar Shaikh Aurangzeb Birthday Post Controversy)





संबंधित मजकूर