
मुंबई (Ramdas Athawale on Congress) : निवडणुक आयोगाने मतदान यादीतुन 13 कोटी नावे वगळली आहेत. त्या 13 कोटी पैकी 2.8 कोटी हे मरण पावलेले मतदार आहेत, 6.2 कोटी स्थलांतरीत झालेले मतदार आहेत, 3 कोटी मतदार हे बेपत्ता आहेत, आणि 1 कोटी मतदार हे त्यांच्या गावी आणि शहरात असे दुहेरी मतदार असल्याने त्यांच्या एका ठिकाणचे मतदार यादीतील नाव वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे मतदार यादीतील दुरुस्ती करुन सुधारित मतदार यादी करणे चुकीचे नाही. त्यामुळे निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना बदनाम करण्याचे कॉग्रेसचे आरोप चुकीचे आहेत. निवडणुक आयोगासारखा घटनात्मक स्वंतत्र संस्थेवर शंका घेणे चुकीचे आहे. निवडणुक आयोगाला बदनाम करण्याच्या माध्यमातुन संविधानाला बदनाम करण्याचा कॉग्रेसचा प्रयत्न अक्षम्य अपराध आहे. त्यामुळे आम्ही कॉग्रेसचा तिव्र निषेध करतो, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दादर येथे महायुतीच्या पदयात्रेच्या प्रारंभी केले.(Ramdas Athawale on Congress)
येत्या 2029 च्या निवडणुकीचे मोदीसोबत मी खेळणार आहे क्रिकेट आणि घेणार आहे राहुल गांधीची विकेट, अशी शिघ्र कविता सादर करीत खुमासदार भाषण केले. उध्दवजी तुम्ही होता आमचे मित्र, कारण आमच्या हदयात होत बाबासाहेबांचा चित्र, तुम्ही आहात बाळासाहेबांचे पुत्र, पण तुम्ही पकडलं कॉग्रेसच सुत्र, अशी चारोळी सादर करीत ना. रामदास आठवले यांनी विरोधकांवर टीका केली. कॉग्रेस आणि विरोधी पक्ष देशात अराजकता पसरवुन लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप ना. रामदास आठवले यांनी केला.(Ramdas Athawale on Congress)