मुंबईत आयकर विभागाची ‘ग्लोबल टॅक्स ट्रान्सपरन्सी २०२६’ परिषद; आंतरराष्ट्रीय कर पारदर्शकता आणि अनुपालनावर भर


Global Tax Transparency 2026 Summit

मुंबई (Global Tax Transparency 2026 Summit) : आयकर विभागाच्या (गुप्तचर आणि गुन्हे अन्वेषण संचालनालय) मुंबई विभागातर्फे गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन हॉल येथे ‘ग्लोबल टॅक्स ट्रान्सपरन्सी – २०२६’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले. ‘अनुपालन अधिक सक्षम करणे आणि जागतिक सहकार्याला चालना देणे’ (Strengthening Compliance. Enabling Global Cooperation) ही या परिषदेची मुख्य संकल्पना होती. आंतरराष्ट्रीय कर पारदर्शकता वाढवणे आणि करदात्यांमध्ये स्वेच्छेने कर अनुपालनाला प्रोत्साहन देणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश होता.
 
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) पुढाकाराने आणि अध्यक्ष रवी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात AMFI, APMI, BCCI, BSE, IBA, जनरल इन्शुरन्स कौन्सिल आणि लाइफ इन्शुरन्स कौन्सिल यांसारख्या वित्तीय क्षेत्रातील प्रमुख संघटनांनी सहकार्य केले. (Global Tax Transparency 2026 Summit)
 
FATCA आणि CRS अंतर्गत अनुपालनावर भर
 
या परिषदेला आयकर विभाग प्रधान महासंचालक (गुप्तचर आणि गुन्हे अन्वेषण),नवी दिल्लीचे देवज्योती दास उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आंतरराष्ट्रीय सहकार्य, वित्तीय माहितीचा प्रभावी वापर आणि FATCA व CRS अंतर्गत कर अनुपालन अधिक मजबूत करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. (Global Tax Transparency 2026 Summit)
 
वित्तीय संस्थांनी अचूक माहिती नोंदवणे आणि तिचे योग्य पद्धतीने अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे वित्तीय संस्था आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कर पारदर्शकतेच्या दिशेने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
 
‘NUDGE’ मोहिमेत १.२९ लाख कोटींच्या परदेशी मालमत्तांची माहिती

आयकर विभागाचे संचालक (गुप्तचर आणि गुन्हे अन्वेषण), मुंबई डॉ. संतोष सी. मंकोसकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी FATCA आणि CRS अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर वित्तीय खात्यांची माहिती देवाणघेवाण, वित्तीय संस्थांची जबाबदारी आणि आयकर विभागाच्या ‘NUDGE’ मोहिमांमधून मिळालेल्या सकारात्मक परिणामांची माहिती दिली. (Global Tax Transparency 2026 Summit)
 
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ आणि २०२५ मधील NUDGE मोहिमांदरम्यान करदात्यांनी सुमारे १.२९ लाख कोटी रुपयांच्या परदेशी मालमत्तांची आणि ७,६३० कोटी रुपयांच्या परदेशी उत्पन्नाची माहिती जाहीर केली आहे. तसेच २५ हजारांहून अधिक करदात्यांनी सुधारित आयकर विवरणपत्रे (Revised Returns) दाखल केली. (Global Tax Transparency 2026 Summit)
  
वित्तीय संस्थांसाठी मदत यंत्रणा उभारणार
 
परिषदेत FATCA आणि CRS अंतर्गत अहवाल सादर करण्याच्या जबाबदाऱ्या, योग्य पडताळणी प्रक्रिया, माहितीची गुणवत्ता, अनुपालनातील अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. (Global Tax Transparency 2026 Summit)
 
वित्तीय संस्थांना आवश्यक मार्गदर्शन आणि मदत मिळावी यासाठी नियमित वेबिनार आयोजित करणे, नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आणि स्वतंत्र हेल्पडेस्क सुरू करण्याचा प्रस्तावही विभागाकडून मांडण्यात आला. (Global Tax Transparency 2026 Summit)
 
‘माहिती जाणून घ्या, तपासा आणि अचूक अहवाल द्या!’
 
‘KNOW IT. CHECK IT. REPORT IT RIGHT!’ हा या परिषदेचा प्रमुख संदेश होता. अचूक माहिती सादर करणे, कर अनुपालन अधिक मजबूत करणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कर पारदर्शकता वाढवणे, या उद्दिष्टांसाठी सर्व संबंधितांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
 
आयकर विभागाच्या गुप्तचर आणि गुन्हे अन्वेषण संचालनालय, मुंबई यांच्यातर्फे या परिषदेचा समारोप करण्यात आला. (Global Tax Transparency 2026 Summit)









मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर