औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या मुंब्र्याच्या AIMIM नगरसेविका सहर शेखने तोडले अकलेचे तारे!

औरंगजेबाला ‘श्रद्धा आणि सामर्थ्याने राज्य करणारा सम्राट’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; मुघलांचा इतिहास जमिनीतून कसा मिटवणार, असा आगाऊ सवाल करत हिंदूंना दिवचण्याचा प्रयत्न..

    04-Nov-2026
 
Sahar Shaikh Aurangzeb Instagram Post
 
ठाणे (Sahar Shaikh Aurangzeb Instagram Post) : छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या महाराष्ट्रातक्रूरकर्मा ओरणग्यााचे उदात्तीकरण करण्याचा आगाऊपणा मुंब्र्याच्या AIMIM नगरसेविका सहर युनूस शेख हिने केला आहे. क्रूरकर्मा औरंगजेबाला ‘श्रद्धा आणि सामर्थ्याने राज्य करणारा सम्राट’ संबोधत त्याचा वाढदिवस साजरा करणारी पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर टाकली आहे. एवढ्यावरच न थांबता मुघलांचा इतिहास पुस्तकांतून पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ‘जमिनीतून इतिहास कसा मिटवणार?’ असा सवाल करत तिने थेट आव्हान देण्याचा आव आणला आहे. तिच्या या अत्यंत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह पोस्टमुळे संताप व्यक्त होण्याची शक्यता आहे.
 
सहर शेखच्या @saharyunusshaikh या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दहा छायाचित्रांची रील पोस्ट करण्यात आली आहे. ताजमहाल, हुमायूनची कबर आणि मुघलकालीन वास्तूंची छायाचित्रे पोस्ट करत तिने मुघलांच्या स्थापत्यकलेचे गोडवे गायले आहेत. (Sahar Shaikh Aurangzeb Instagram Post)
 
हुमायूनच्या कबरीसमोरील छायाचित्रावर ‘मुघलांसारख्या वास्तू आज कोणीही बांधू शकत नाही. एवढी भव्य कबर बांधणारे राज्य कसे चालवत असतील, याचा कधी विचार केला आहे का?’ असा सवाल तिने केला आहे. ताजमहालच्या छायाचित्रासोबतही मुघलांनी बांधलेल्या वास्तूमुळे भारताला जगातील सात आश्चर्यांमध्ये स्थान मिळाल्याचा दावा केला आहे. (Sahar Shaikh Aurangzeb Instagram Post)
 
मात्र, तिच्या पोस्टमधील सर्वाधिक आक्षेपार्ह भाग म्हणजे औरंगजेबाचे केलेले उदात्तीकरण! सिंहासोबत औरंगजेबाचे छायाचित्र टाकून ‘या सम्राटाची प्रतिमा इतकी प्रभावी आहे की त्याला बदनाम करण्यासाठी दरवर्षी प्रोपगंडा चित्रपट बनवावे लागतात,’ असा मजकूर तिने लिहिला आहे. त्यावरही कळस म्हणजे पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘Happy birthday to the most controversial Mughal emperor Aurangzeb (RA). The emperor who ruled with faith and strength. Malik-ul-Hind’ असे लिहून औरंगजेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Sahar Shaikh Aurangzeb Instagram Post)
 
शंभूराजांच्या छळकर्त्याचे उदात्तीकरण कशासाठी?
 
ज्या औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले, संभाजी महाराजांना दगाबाजी करून पकडण्यात आले, त्यांच्यावर अमानुष अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली, त्याच औरंगजेबाला श्रद्धा आणि सामर्थ्याचा सम्राट म्हणण्याचा आगाऊपणा सहर शेखने केला आहे. शंभूराजांच्या बलिदानाचा इतिहास महाराष्ट्राच्या अस्मितेचा अविभाज्य भाग असताना त्यांच्या छळकर्त्याचे अशा पद्धतीने गौरवीकरण करणे हे निश्चितच गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहे. (Sahar Shaikh Aurangzeb Instagram Post)
 
त्यातच ‘मुघलांचा इतिहास पुस्तकांतून पुसायचा प्रयत्न केला जात आहे; पण जमिनीतून कसा मिटवणार?’ असा सवाल करत तिने आव्हानात्मक सूर लावला आहे. हा इतिहासाचा अभ्यास आहे की एका वादग्रस्त ऐतिहासिक सत्ताधीशाचे समर्थन, असा सवाल उपस्थित होत आहे.
 
नगरसेवक म्हणून जनतेचे प्रश्न सोडवायचे की औरंगजेबाचे गोडवे गायचे?
 
मुंब्र्यातील नागरिकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिल्यानंतर पाणी, रस्ते, गटारे, आरोग्य आणि नागरी सुविधांचे प्रश्न सोडवणे ही सहर शेखची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, नागरिकांच्या प्रश्नांऐवजी औरंगजेबाचे उदात्तीकरण आणि मुघल इतिहासाच्या समर्थनासाठी सोशल मीडियावर आक्रमक भूमिका घेण्याची गरज काय, असा सवाल मुंब्रा मधील नागरिक उपस्थित करत आहे. (Sahar Shaikh Aurangzeb Instagram Post)





संबंधित मजकूर