ट्रम्प यांनी ‘जिहादी अब्दुल’ म्हणून हिणवले, तेच अब्दुल अल-सैयद मिशिगनमध्ये विजयी! भारतातील भटकळशीही खास नाते!


 Abdul El-Sayed Michigan Senate Election

वॉशिंग्टन (Abdul El-Sayed Michigan Senate Election) :
अमेरिकेच्या मिडटर्म निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. दरम्यान, मिशिगनमधील सिनेटच्या जागेसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार अब्दुल अल-सैयद यांनी रिपब्लिकन उमेदवार माइक रॉजर्स यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे अल-सैयद अमेरिकेच्या सिनेटमध्ये निवडून जाणारे पहिले मुस्लिम व्यक्ती ठरणार आहेत. विशेष म्हणजे, अल-सैयद यांचे भारताशीही खास नाते आहे.
 
अमेरिकेचे पहिले मुस्लिम सिनेटर
 
अब्दुल अल-सैयद यांनी निवडणूक प्रचारात सर्वांसाठी आरोग्यसेवा (युनिव्हर्सल हेल्थकेअर) आणि सरकारमधील उत्तरदायित्व या मुद्द्यांवर भर दिला होता. सामान्य नागरिकांना सहज आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांनी आपली भूमिका मांडली. (Abdul El-Sayed Michigan Senate Election)
मिशिगन हे अमेरिकेतील महत्त्वाच्या राजकीय रणांगणांपैकी एक मानले जाते. त्यामुळे या राज्यातील सिनेटची निवडणूक देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. डेमोक्रॅटिक पक्षासाठी हा विजय महत्त्वाचा ठरला आहे.
 
भारतातील भटकळशी अल-सैयद यांचे खास नाते
 
अब्दुल अल-सैयद यांच्या भारताशी असलेल्या संबंधांचीही या निवडणुकीनंतर चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या पत्नी डॉ. सारा जुकाकू या व्यवसायाने मानसोपचारतज्ज्ञ आहेत. त्यांच्या कुटुंबाचे मूळ कर्नाटकातील भटकळ येथे आहे. हे ठिकाण मंगळुरूपासून सुमारे १४० किलोमीटर अंतरावर आहे. (Abdul El-Sayed Michigan Senate Election)
 
सारा या जुकाकू शमसुद्दीन यांच्या नात आहेत. शमसुद्दीन यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बी. डी. जत्ती यांच्या नेतृत्वाखालील म्हैसूर संस्थानच्या सरकारमध्ये अर्थ उपमंत्री म्हणून काम केले होते.
 
‘मी अरब असण्यापेक्षा भारतीय अधिक आहे’
 
एका मुलाखतीत अल-सैयद यांनी पत्नीच्या दक्षिण भारतीय कुटुंबाशी असलेल्या आपल्या नात्याबद्दल भाष्य केले होते. ते म्हणाले होते, “माझे लग्न दक्षिण भारतीय कुटुंबातील मुलीशी झाले असून, या नात्याला २० वर्षे झाली आहेत. आता मी त्या संस्कृतीत पूर्णपणे मिसळलो आहे.” (Abdul El-Sayed Michigan Senate Election)
 
पुढे ते म्हणाले होते, “खरं सांगायचं तर, मी अरब असण्यापेक्षा भारतीय अधिक आहे. माझ्या पत्नीच्या कुटुंबाची मुळे भटकळमध्ये आहेत. मात्र, कुटुंबातील बहुतांश सदस्य आता बंगळुरूमध्ये स्थायिक झाले आहेत.”
 
अल-सैयद आणि सारा यांची भेट मिशिगन विद्यापीठात शिक्षण घेत असताना झाली होती. (Abdul El-Sayed Michigan Senate Election)
 
वैद्यकीय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश
 
अब्दुल अल-सैयद यांचा राजकीय प्रवास वैद्यकीय क्षेत्रातून सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी डॉक्टर होण्यासाठी प्रशिक्षण घेतले. मात्र, लोकांच्या आरोग्यविषयक समस्यांमागे केवळ वैद्यकीय कारणे नसून राजकीय व्यवस्थेतील त्रुटीही जबाबदार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक आरोग्य आणि सरकारी प्रशासनाच्या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. (Abdul El-Sayed Michigan Senate Election)
 
त्यांनी वेन काउंटीच्या आरोग्य, मानव सेवा आणि माजी सैनिक सेवा विभागाचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. याच अनुभवाच्या आधारावर त्यांनी निवडणूक प्रचारात सर्वांसाठी आरोग्यसेवा आणि सरकारी यंत्रणेतील उत्तरदायित्व या मुद्द्यांना प्राधान्य दिले.
 
ट्रम्प यांच्याकडून अब्दुल अल-सैयद यांचा ‘जिहादी’ उल्लेख
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान अब्दुल अल-सैयद यांच्यावर जोरदार टीका केली होती. ट्रम्प यांनी त्यांचा उल्लेख ‘जिहादी’ असा केला होता. प्रचारसभेतील भाषणात ट्रम्प यांनी अल-सैयद यांच्यावर अमेरिकेत शरिया कायदा लागू करण्याची इच्छा असल्याचा आरोप केला होता. (Abdul El-Sayed Michigan Senate Election)
 
“अब्दुल आपल्या देशात शरिया कायदा लागू करू इच्छितो. जर तो त्यात कधी यशस्वी झाला, तर सर्वप्रथम त्याच्यावरच खटला चालवला पाहिजे आणि मी त्याचा साक्षीदार असेन,” असे ट्रम्प आपल्या प्रचारसभेतील भाषणात म्हणाले."
 
ट्रम्प पुढे म्हणाले, 'मी येथे एका मुस्लिम जिहादी सदस्याला अमेरिकेचा सेनेटर होण्यापासून रोखण्यासाठी आलो आहे.' (Abdul El-Sayed Michigan Senate Election)





मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर