...तर मी परत रॅम्पवॉक करेन -मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण महिलांच्या कामाला ओळख मिळण्यासाठी बॉम्बे टाईम्स फॅशन वीक मोठी गोष्ट

    03-Nov-2026   
 

Pankaja Munde Jalnai Saree
 
मुंबई (Pankaja Munde Jalnai Saree) : मला रॅम्पवॉक करण्याची हौस नाही. पण माझ्या जालन्यातील महिलांसाठी परत मला रॅम्पवॉक करायचे असल्यास मी परत करेन. पण माझी जालन्यातील साडी मुंबईतील महिला विकत घेत असेल तर तो पैसा जालन्याच्या महिलेच्या खिशात जाईल, असे प्रत्युत्तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांना दिले.
'बॉम्बे टाइम्स फॅशन वीक'मध्ये जालना जिल्ह्यातील शेतकरी महिलांनी तयार केलेल्या 'जालनाई' साडीचे प्रमोशन करण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या रॅम्प वॉकवरून सध्या राजकारण तापले आहे. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. (Pankaja Munde Jalnai Saree)
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मी राजकारणात २२ वर्षे सक्रीय असून मी ग्रामीण भागाचे प्रतिनिधीत्व करते. ग्रामीण महिलांना न्याय मिळावा, त्यांच्या कामाला ओळख मिळावी यासाठी बॉम्बे टाईम्स फॅशन वीक ही फार मोठी गोष्ट आहे. तिथे माझ्या जालनातील महिलांचा स्टॉल लागणे ही फार मोठी गोष्ट आहे. त्यासाठी मी तो रॅम्पवॉक केला. मला रॅम्पवॉक करण्याची हौस नाही. या सगळ्या टीकांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही. त्या महिलांसाठी परत मला रॅम्पवॉक करायचे असल्यास मी परत करेन. पण माझी जालन्यातील साडी मुंबईतील महिला विकत घेत असेल तर तो पैसा जालन्याच्या महिलेच्या खिशात जाईल." (Pankaja Munde Jalnai Saree)
"मी जालन्याची पालकमंत्री आहे. जालना आणि बीड सिल्कमध्ये क्रमांक एकवर आहे. जालन्याच्या महिलांना रोजगार मिळण्यासाठी सहकार विभागासोबत प्रशिक्षण घेऊन सुंदर वस्त्र तयार करून त्याचे बाहेर विक्री करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याअंतर्गत बॉम्बे टाईम्स वीक फॅशनने मला निमंत्रित केले होते. हा नॉर्मल रॅम्पवॉक नव्हता. वेगवेगळ्या क्षेत्रांच्या सीईओंनी हा रॅम्प वॉक केला. आम्ही मॉडेल्स नव्हतो. त्यांनी पर्यावरण मंत्री म्हणून मला बोलवले. जालन्याला स्टॉल मिळावा अशी विनंती मी त्यांना केली होती. तिथे जालनातील महिलांचा स्टॉल लागणे ही मोठी गोष्ट आहे," असेही त्या म्हणाल्या.  (Pankaja Munde Jalnai Saree)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर