मुंबई (Maharashtra Gets ₹7,022 Crore) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना कर महसुलातील आगाऊ हप्ता वितरित केला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला तब्बल ७ हजार २२ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
केंद्र सरकारकडून वेळेवर मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे महाराष्ट्रातील विविध विकासकामांना मोठी गती मिळणार असून, त्याचा लाभ राज्यातील जनतेलाही होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.
दिवाळीपूर्वी राज्यांना कर महसुलातील आगाऊ हप्ता वितरित करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे राज्यांना आर्थिक बळ मिळणार असून, विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
केंद्र सरकारने वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या प्रति मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारकडून मिळालेल्या या निधीमुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, विविध विकास प्रकल्प आणि जनकल्याणकारी योजनांसाठी आर्थिक तरतूद करणे शक्य होणार आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारकडून राज्यांना त्यांच्या निर्धारित वाट्यानुसार कर महसुलाचे वितरण केले जाते. या निधीचा उपयोग राज्य सरकारकडून विविध विकासकामे, पायाभूत सुविधा प्रकल्प, सामाजिक कल्याणकारी योजना आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी केला जातो. दिवाळीपूर्वी वितरित करण्यात आलेल्या या आगाऊ हप्त्यामुळे राज्यांना आर्थिक नियोजन करणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच विकासकामांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध होऊन राज्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. (Maharashtra Gets ₹7,022 Crore)
केंद्र सरकारकडून कोणत्या राज्याला किती निधी?
कर महसुलाच्या आगाऊ हप्त्याचे राज्यनिहाय वाटप (कोटी रुपयांत)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.