पक्के वैरी होणार सख्खे मित्र? नेतन्याहू आणि आइजनकोट यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक; पंतप्रधानपदावर होणार चर्चा!

 
Benjamin Netanyahu Gadi Eisenkot Meeting
 
तेल अवीव (Benjamin Netanyahu Gadi Eisenkot Meeting) : इस्रायलच्या राजकारणात सत्तावाटपावरून सुरू असलेल्या चर्चांना आता वेग आला आहे. कार्यवाहक पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि ‘याशर’ पक्षाचे प्रमुख गादी आइजनकोट यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तेल अवीवमधील इस्रायली संरक्षण दलाच्या (IDF) मुख्यालयात ही बैठक पार पडणार असून, त्यापूर्वी सुरक्षा विषयक माहिती देण्यात येणार आहे.
 
हर्जलिया ऐवजी लष्करी मुख्यालयात बैठक
 
‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ने आइजनकोट यांच्या पक्षाच्या निवेदावतीने दिलेल्या वृत्तानुसार, ही बैठक सुरुवातीला हर्जलिया येथे होणार होती. आइजनकोट यांनी नेतन्याहू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. मात्र, आता बैठकीचे ठिकाण बदलून तेल अवीवमधील IDFच्या मुख्यालयात निश्चित करण्यात आले आहे.(Benjamin Netanyahu Gadi Eisenkot Meeting)
 
शनिवारी नेतन्याहू यांनी आइजनकोट यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या एकता सरकारमध्ये स्वतः पर्यायी पंतप्रधान म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर या बैठकीची घोषणा झाल्याने इस्रायलच्या राजकीय वर्तुळात या घडामोडीकडे लक्ष लागले आहे.
 
नेतन्याहू यांच्या भूमिकेत बदल; इराणसंबंधी अट
 
नेतन्याहू यांचा हा प्रस्ताव त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेपेक्षा वेगळा असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी त्यांनी सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या पक्षानेच सरकारचे नेतृत्व करावे, अशी भूमिका मांडली होती. आता त्यांनी स्वतः पर्यायी पंतप्रधानपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. नेतन्याहू यांची लिकुड पार्टी सत्तेबाहेर ठेवून विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे. (Benjamin Netanyahu Gadi Eisenkot Meeting)
 
मात्र, या प्रस्तावासोबत नेतन्याहू यांनी एक अट ठेवल्याचे वृत्त आहे. इराणकडून उद्भवू शकणाऱ्या संभाव्य सुरक्षा संकटाचा सामना करण्यासाठी सुरुवातीच्या काही काळासाठी आपणच पंतप्रधान राहावे आणि त्यानंतर पद आइजनकोट यांच्याकडे सोपवावे, अशी त्यांची मागणी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आइजनकोट यांनी ही अट स्पष्टपणे नाकारल्याचा दावा वृत्तांत करण्यात आला आहे.
 
आइजनकोट यांचा २४ तासांचा अल्टिमेटम
 
यापूर्वी शनिवारी आइजनकोट यांनी नेतन्याहू आणि लिकुड पार्टीला चर्चेतील गांभीर्य दाखवण्यासाठी २४ तासांची मुदत दिली होती. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत, लिकुड पार्टी खऱ्या अर्थाने एकता सरकार स्थापन करण्यास इच्छुक असेल, तर नेतन्याहू यांनी हर्जलिया येथील डॅन अकादिया हॉटेलमध्ये येऊन मूलभूत धोरणांवर थेट चर्चा करावी, असे आवाहन केले होते. (Benjamin Netanyahu Gadi Eisenkot Meeting)
 
नेतन्याहू यांच्या विनंतीवरून स्थापन करण्यात आलेल्या एका गोपनीय माध्यमातून तीन आठवड्यांपूर्वी सविस्तर प्रस्ताव पाठवला होता. मात्र, त्यावर अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नसून केवळ टाळाटाळ आणि नकारच मिळाल्याची नाराजीही आइजनकोट यांनी व्यक्त केली होती. (Benjamin Netanyahu Gadi Eisenkot Meeting)
 
देशाच्या सुरक्षेचा हवाला देत नेतन्याहू यांचे चर्चेचे आवाहन
 
दुसरीकडे, नेतन्याहू यांनी तातडीने चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले आहे. देशाच्या अस्तित्वासमोर मोठा धोका उभा असल्याने मजबूत सरकारची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याच जबाबदारीतून सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या पक्षानेच सरकारचे नेतृत्व करावे, या आपल्या पूर्वीच्या भूमिकेत बदल करून आइजनकोट यांना पंतप्रधानपद देण्याची आणि स्वतः पर्यायी पंतप्रधान म्हणून काम करण्याची तयारी दर्शवल्याचे त्यांनी सांगितले.
 
आता या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये सत्तावाटप आणि सरकारच्या मूलभूत धोरणांवर एकमत होते का, याकडे इस्रायलच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Benjamin Netanyahu Gadi Eisenkot Meeting)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर