मदुराई ( Tirupparankundram Karthigai Deepam) : तामिळनाडूतील मदुराई येथील तिरुपरंकुंड्रम टेकडीवरील दीपप्रज्वलनाचा वाद अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी टेकडीवरील पारंपरिक दीपस्तंभावर कार्तिगाई दीपम प्रज्वलित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ९ तुकड्यांमधील सुमारे १५० जवानांना सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. मंदिरापासून टेकडीच्या शिखरापर्यंत तसेच सिकंदर दरगाह परिसरातही पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दीपस्तंभाभोवती बॅरिकेडिंग करण्यात आले असून, टेकडीवर जाणाऱ्या भाविकांची ओळखपत्रे तपासल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जात आहे. स्थानिक ग्रामस्थांनी फुलांची उधळण करून सीआरपीएफ जवानांचे स्वागत केले. दरम्यान, दीपस्तंभापासून अवघ्या १५ मीटर अंतरावर सिकंदर दरगाह असल्याने या ठिकाणी दीप प्रज्वलित करण्यावरून मंदिर आणि दरगाहशी संबंधित वाद निर्माण झाला आहे. ( Tirupparankundram Karthigai Deepam)
VIDEO | Karthigai Deepam: People welcome CRPF personnel in Madurai by showering flowers.
The Supreme Court has ordered the lighting of the lamp at the disputed Deepathoon stone pillar atop Thiruparankundram hill on Saturday.
#Deepam https://t.co/HFs6neukHP
तिरुपरंकुंड्रम टेकडीवरील कार्तिगाई दीपम उत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक दीपस्तंभावर दिवा प्रज्वलित करण्याची मागणी हिंदू भाविकांकडून करण्यात येत आहे. मात्र, दीपस्तंभाच्या जवळच सिकंदर दरगाह असल्याने या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला. यापूर्वी २४ नोव्हेंबर रोजी कार्तिगई दीपम उत्सवादरम्यान उचि पिल्लैयार मंदिराजवळील पारंपरिक दीप मंडपात दिवा प्रज्वलित करण्यात आला होता. मात्र, वादग्रस्त दीपस्तंभावर पारंपरिक दिव्याऐवजी केवळ विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
यामुळे भाविकांनी दीप मंडपाबरोबरच टेकडीवरील पारंपरिक दीपस्तंभावरही दिवा प्रज्वलित करण्याची मागणी केली. हा वाद न्यायालयात पोहोचल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २० नोव्हेंबर रोजी दीपस्तंभावर दिवा प्रज्वलित करण्यास परवानगी दिली होती. मात्र, २४ नोव्हेंबर रोजी या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. ( Tirupparankundram Karthigai Deepam)
#WATCH | Madurai, Tamil Nadu: Central Reserve Police Force (CRPF) personnel are being deployed to Thiruparankundram Hill, where the ceremonial Karthigai Deepam will be lit at the Deepathoon stone pillar today.
CRPF has taken security control of the hill and Sri Subramania Swamy Temple after the Supreme Court ordered Central forces to secure the area for lighting the Karthigai Deepam at Deepathoon.
२७ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाचे पुन्हा निर्देश
२४ नोव्हेंबरच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने २७ नोव्हेंबर रोजी पुन्हा हस्तक्षेप केला. न्यायालयाने दीपस्तंभावर कार्तिगई दीपम प्रज्वलित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. सुरुवातीला २४ नोव्हेंबर रोजी उचि पिल्लैयार मंदिराच्या मंडपात प्रज्वलित करण्यात आलेल्या ज्योतीपासून दीपस्तंभावर दिवा लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, न्यायालयाला ती ज्योत विझल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी नव्याने ज्योत प्रज्वलित करून दीपस्तंभावर दिवा लावण्याचे निर्देश देण्यात आले. ( Tirupparankundram Karthigai Deepam)
मंदिर ट्रस्ट बोर्ड निलंबित; दोन माजी न्यायमूर्तींकडे प्रशासन
या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने मंदिराच्या ट्रस्ट बोर्डाला निलंबित करत मंदिराचा कारभार मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस. वैद्यनाथन आणि व्ही. पार्थिबन यांच्याकडे सोपवला आहे.
याशिवाय राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक (डीजीपी), मदुराईचे जिल्हाधिकारी आणि मंदिर प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. ( Tirupparankundram Karthigai Deepam)
Madurai, Tamil Nadu: A group of Muslim pilgrims from Keralam visit Sikandar Dargah on Thiruparankundram Hill to offer special prayers. https://t.co/7z7ysGUkvL
सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या मुख्य सचिवांना पुढील सुनावणीवेळी वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांमधील फोन कॉल्स, संदेश आणि ई-मेल्सचा तपशीलही सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ डिसेंबर रोजी होणार आहे. ( Tirupparankundram Karthigai Deepam)
सीआरपीएफ च्या ताब्यात सुरक्षा; दरगाहमधील भाविकांनाही परवानगी
दीपप्रज्वलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मंदिर आणि टेकडी परिसरातील सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफ कडे सोपवली आहे. त्यानुसार, टेकडीच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत जवान तैनात करण्यात आले आहेत. दीपस्तंभाभोवती बॅरिकेडिंग करण्यात आली असून, ओळखपत्रांची तपासणी करूनच भाविकांना प्रवेश दिला जात आहे. ( Tirupparankundram Karthigai Deepam)
विशेष म्हणजे, दीपप्रज्वलनाच्या वेळी सिकंदर दरगाहपासून सर्व दिशांना किमान ५० मीटर अंतर राखण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. त्याचवेळी दरगाहमध्ये प्रार्थना करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना रोखू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आज तिरुपरंकुंड्रम टेकडीवरील दीपस्तंभावर कार्तिगाई दीपम प्रज्वलित करण्याच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आणि दोन्ही धार्मिक स्थळांवरील भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे. ( Tirupparankundram Karthigai Deepam)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.