इटलीत शाळांमध्ये हिजाब -नकाबवर बंदी; मेलोनी सरकारचा मोठा निर्णय!

 
Italy School Hijab Ban 2026
 
रोम (Italy School Hijab Ban 2026) : इटलीने शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करणाऱ्या नव्या सुधारणेला संसदेच्या कनिष्ठ सभागृहाची अंतिम मंजुरी मिळवली आहे. या नव्या कायद्यानुसार शाळांमधील वर्गांमध्ये चेहरा पूर्णपणे झाकणाऱ्या पोशाखांवर बंदी घालण्यात आली असून, पहिल्या वर्गांमध्ये काही विशिष्ट निकषांनुसार परदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आले आहे. तसेच, इटालियन भाषा शिकण्यात अडचण येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी भाषा अभ्यासक्रमाची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारने आणलेल्या या सुधारणेला विरोधी पक्षांनी भेदभावपूर्ण ठरवत विरोध केला आहे.

१४२ मतांनी शिक्षण सुधारणेला मंजुरी
 
‘डेक्रेटो स्कुओला’ (Decreto Scuola) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिक्षण सुधारणेला इटलीच्या चेंबर ऑफ डेप्युटीज या कनिष्ठ सभागृहात १४२ मते मिळाली. तर ११२ सदस्यांनी विरोधात मतदान केले . यापूर्वी २० नोव्हेंबर रोजी सिनेटने या विधेयकाला मंजुरी दिली होती. त्यानंतर कनिष्ठ सभागृहाच्या मंजुरीने या सुधारणेचा संसदीय मार्ग पूर्ण झाला.
 
३० सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या डिक्री-लॉ क्रमांक १७० चा हा भाग आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात, राष्ट्रीय पुनर्प्राप्ती आणि रेजिलिएंस योजना (PNRR) अंतर्गत उपक्रमांना पाठबळ आणि परदेशी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व्यवस्थेत एकत्रीकरण अशा विविध बाबींचा या कायद्यात समावेश आहे. (Italy School Hijab Ban 2026)
 
बुरखा आणि नकाबवर निर्बंध; परदेशी विद्यार्थ्यांसाठी ३० टक्क्यांची मर्यादा
 
नव्या नियमांनुसार शाळांमधील शैक्षणिक उपक्रमांदरम्यान हिजाब -नकाबवर बंदी घालण्यात आली आहे.या नव्या सुधारणेतील आणखी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे पहिल्या वर्गांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवणे. ही मर्यादा सर्व परदेशी विद्यार्थ्यांना सरसकट लागू होणार नाही. विद्यार्थ्यांचे नागरिकत्व, इटलीतील जन्म आणि त्यांनी यापूर्वी घेतलेले शिक्षण अशा निकषांनुसार तिची अंमलबजावणी होणार आहे. इटालियन भाषेचे पुरेसे ज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांना या मर्यादेतून सूट देण्याचीही तरतूद आहे. (Italy School Hijab Ban 2026)
 
या निर्णयामुळे परदेशी विद्यार्थ्यांची संख्या अधिक असलेल्या शाळांमधील वर्गरचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यापूर्वी २०१० मध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री मारियास्टेला गेल्मिनी यांनी परदेशी विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारची ३० टक्क्यांची मर्यादा लागू करण्यासाठी परिपत्रक जारी केले होते. मात्र, स्थानिक लोकसंख्येची रचना आणि अंमलबजावणीतील अडचणींमुळे अनेक ठिकाणी या नियमाची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकली नव्हती.
 
परदेशी पालकांसाठी इटालियन भाषा अभ्यासक्रम
 
इटलीच्या शिक्षण व्यवस्थेत परदेशी विद्यार्थ्यांचे एकत्रीकरण सुलभ करण्यासाठी त्यांच्या पालकांसाठीही इटालियन भाषा अभ्यासक्रमाची तरतूद करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना भाषेच्या अडचणींमुळे शाळेतील शिक्षण आणि इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात अडथळे येतात, त्यांच्या पालकांना भाषा शिकण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे. काही परिस्थितींमध्ये पालकांना हे अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक असेल. अभ्यासक्रमाला उपस्थित न राहिल्यास दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. (Italy School Hijab Ban 2026)
 
मेलोनी यांनी निर्णयाचे केले समर्थन
 
पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी यापूर्वीच या सुधारणेची घोषणा केली होती. त्यांच्या मते, इटालियन भाषा न समजणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एखाद्या वर्गात मोठ्या प्रमाणात असल्यास त्यांच्या शिक्षण आणि एकत्रीकरणावर परिणाम होऊ शकतो. इटालियन विद्यार्थ्यांनाच त्यांच्या वर्गात अल्पसंख्याक असल्याची भावना निर्माण होणे स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी म्हटले होते.
 
‘ब्रदर्स ऑफ इटली’ या त्यांच्या पक्षाच्या युवा संघटनेने आयोजित केलेल्या सभेत बोलताना मेलोनी यांनी इटालियन विद्यार्थ्यांना वर्गात उपेक्षित किंवा वेगळे पडल्यासारखे वाटता कामा नये, अशी भूमिका मांडली. त्यांच्या सरकारने या उपाययोजना विद्यार्थ्यांचे एकत्रीकरण, भाषिक कौशल्य आणि शैक्षणिक समान संधी वाढवण्यासाठी असल्याचे सांगितले आहे. मात्र, या निर्णयामुळे इटलीतील स्थलांतरित कुटुंबे आणि शिक्षण व्यवस्थेवर काय परिणाम होतो, याकडे आता लक्ष लागले आहे. (Italy School Hijab Ban 2026)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर