‘महिला आरक्षणाच्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा दूर करू!’ मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर पंतप्रधान मोदींचा ठाम निर्धार!




 Women Reservation Bill 2026
नवी दिल्ली (Women Reservation Bill 2026) : संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरण आणि महिला आरक्षण विधेयकाबाबत सरकारची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. देशातील महिलांना सक्षम बनवण्याचा सरकारचा संकल्प कायम असून, त्यांना धोरणनिर्मिती प्रक्रियेत योग्य प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आपली भूमिका मांडली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यास सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. या मागणीसाठी अनेक दशकांपासून संघर्ष सुरू आहे. या लढ्यात आपणही सहभागी असल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील नारीशक्तीला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकार संकल्पबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. (Women Reservation Bill 2026)





परिसीमन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर केंद्राची नवी तयारी
 
महिला आरक्षणाबाबत पंतप्रधानांनी दिलेले हे आश्वासन केंद्र सरकारकडून परिसीमन विधेयक पुढे नेण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहे. केंद्र सरकारने २०२३ मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी परिसीमन प्रक्रियेशी जोडली आहे.
 
सरकारच्या प्रस्तावानुसार, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघांची नव्याने पुनर्रचना झाल्यानंतर वाढलेल्या लोकसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची योजना आहे. त्यामुळे आगामी काळात महिला आरक्षण आणि परिसीमन हे दोन्ही मुद्दे संसदेच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. (Women Reservation Bill 2026)

महिला आरक्षण कायद्यात दुरुस्तीची तयारी
 
लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार विद्यमान कायद्यात दुरुस्ती करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. एप्रिल २०२६ मध्ये लोकसभेत संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर होऊ न शकल्यानंतर हे प्रस्तावित बदल पुढे आणले जात असल्याचे सांगितले जात आहे. (Women Reservation Bill 2026)
 
यापूर्वीच्या विधेयकात महिला आरक्षणाची अंमलबजावणी परिसीमन प्रक्रियेशी जोडण्यात आली होती. तसेच, लोकसभेच्या सध्याच्या ५४३ जागांची संख्या वाढवून ती कमाल ८५० पर्यंत नेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
 
३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन
 
संसदेचे विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेच्या बैठकीने सुरू होणार आहे, तर राज्यसभेचे कामकाज २ डिसेंबरपासून सुरू होईल. सरकारी कामकाजानुसार हे विशेष अधिवेशन ३ डिसेंबर रोजी संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिवेशनात महिला आरक्षण आणि परिसीमनाशी संबंधित प्रस्तावांवर कोणती चर्चा किंवा निर्णय होतो, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. (Women Reservation Bill 2026)
 

 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर