माफियागिरीचा खात्मा! खाकी वर्दीवर गोळीबार करणारा कुख्यात गुन्हेगार प्रताप दास; पोलिसांना पाहताच पाण्याच्या टाकीत लपला, पायात गोळी झाडून अटक!

 
Pratap Das Arrest Asansol
 
आसनसोल (Pratap Das Arrest Asansol) : प. बंगालमधील आसनसोल येथील कुख्यात गुन्हेगार प्रताप दास याला पोलिसांनी शुक्रवारी सकाळी चकमकीनंतर अटक तरण्यात. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हाय-व्होल्टेज पोलीस मोहिमेचा अखेर या कारवाईनंतर शेवट झाला. आसनसोल-दुर्गापूर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष ऑपरेशन ग्रुपने (SOG) हीरापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इस्माइल परिसरातील पंजा गल्लीजवळ ही कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात प्रतापच्या उजव्या पायाला गोळी लागली असून, त्याला उपचारासाठी आसनसोल जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
पोलिसांना पाहताच पाण्याच्या टाकीमागे लपला
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ९ वाजता प्रताप इस्माइल परिसरातील आपल्या घराजवळ शस्त्र घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर SOG चे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू करण्यात आली. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिसांनी परिसरातील भिंतींवर चढूनही त्याचा शोध घेतला. (Pratap Das Arrest Asansol)
 


पोलिसांची घेराबंदी पाहून प्रताप एका बांधकाम सुरू असलेल्या घरात पाण्याच्या टाकीमागे लपल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले; मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. उलट त्याने पोलिसांच्या दिशेने शस्त्र रोखले. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्या पायावर गोळी झाडली. ही गोळी त्याच्या उजव्या पायाला लागली. त्यानंतर या मोहिमेचे नेतृत्व करणारे डीसीपी (सेंट्रल) ध्रुव दास यांनी प्रताप दासला जखमी अवस्थेत अटक केले. तासाभराहून अधिक काळ चाललेल्या या मोहिमेनंतर पोलिसांना यश आले. (Pratap Das Arrest Asansol)
 
दोन दिवसांपासून सुरू होता शोध
 
बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी आसनसोल दक्षिण पोलीस ठाण्याचे पथक गुप्त माहितीच्या आधारे प्रताप दासला अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले होते. मात्र, त्यावेळी प्रतापने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप असून, तो घटनास्थळावरून फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांची अनेक पथके त्याच्या शोधासाठी तैनात करण्यात आली होती. (Pratap Das Arrest Asansol)

गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत आसनसोल दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हट्टन रोड परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, त्यावेळी प्रतापचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता. अखेर शुक्रवारी सकाळी इस्माइल परिसरात त्याला घेरून अटक करण्यात पोलिसांना यश आले.
 
या कारवाईनंतर परिसरात भीतीचे वातावरण आणि मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी दुर्गापूर येथे प्रशासकीय बैठकीसाठी येणार असल्याने या पोलीस कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. (Pratap Das Arrest Asansol)






मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर