विशेष अधिवेशनापूर्वी दिल्लीत राजकीय खलबते! सत्ताधारी-विरोधकांच्या बैठकांचे सत्र सुरू!

 
Parliament Special Session 2026
 
नवी दिल्ली (Parliament Special Session 2026) : केंद्र सरकारने ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि विरोधकांनी आपापली तयारी वेगाने सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत परिसीमन (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षणाशी संबंधित प्रस्तावित विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, यापूर्वी मांडण्यात आलेल्या विधेयकांमध्ये सुधारणा करून ती नव्याने संसदेत सादर करण्याबाबतही सरकार विचार करू शकते.
 
दुसरीकडे, काँग्रेसनेही शुक्रवारी संध्याकाळी ४.३० वाजता दिल्लीत संसदीय रणनीती गटाची बैठक बोलावली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत विशेष अधिवेशनात विरोधकांनी कोणती भूमिका घ्यावी, यावर चर्चा होणार आहे.
 
दरम्यान, डीएमके, वायएसआर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षांनी विधेयकांना काही अटींसह पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या प्रस्तावित विधेयकांवरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. (Parliament Special Session 2026)
 
३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन
 
सरकारने गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी दिलेल्या माहितीनुसार, संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार, लोकसभेचे कामकाज ३० नोव्हेंबरपासून, तर राज्यसभेचे कामकाज २ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज ३ डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता असून, त्यानंतर अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित केले जाईल. (Parliament Special Session 2026)
 
या अधिवेशनात परिसीमन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयके मांडली जाणार की नाही, याबाबत सरकारने अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, सर्व राज्यांमधील लोकसभा मतदारसंघांची संख्या समान प्रमाणात ५० टक्क्यांनी वाढवण्याचा पर्याय विचाराधीन असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
विशेष अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास आणि शून्यकाल नसणार
 
लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, या विशेष अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास (प्रश्नकाल) आणि शून्यकाल होणार नाही. अधिवेशनात प्रामुख्याने आवश्यक सरकारी कामकाजावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. लोकसभेचे कामकाज ३० नोव्हेंबरपासून, तर राज्यसभेचे कामकाज २ डिसेंबरपासून सुरू होईल. ३ डिसेंबर रोजी दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित केले जाणार आहे. (Parliament Special Session 2026)

लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८५० करण्याची तयारी?
 
प्रस्तावित विधेयकांनुसार, परिसीमनाच्या माध्यमातून लोकसभेच्या सध्याच्या ५४३ जागांची संख्या वाढवून कमाल ८५० पर्यंत नेण्याचा पर्याय आहे. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा करणे, हा सरकारचा यामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. हे आरक्षण २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून लागू करण्याचा सरकारचा विचार असल्याची चर्चा आहे. (Parliament Special Session 2026)

डीएमकेचा सशर्त पाठिंबा; दक्षिणेकडील राज्यांच्या प्रतिनिधित्वाची चिंता
 
परिसीमनाच्या मुद्द्यावर डीएमकेने लोकसभेच्या जागा वाढवण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, तमिळनाडूचे लोकसभेतील सध्याचे सुमारे ७.२ टक्के प्रतिनिधित्व कायम राखले जावे, अशी पक्षाची प्रमुख अट आहे.
 
सध्या लोकसभेच्या ५४३ जागांपैकी तमिळनाडूच्या वाट्याला ३९ जागा आहेत. लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत चांगली कामगिरी करणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांना परिसीमनामुळे राजकीय नुकसान सहन करावे लागू नये, अशी द्रमुकची भूमिका आहे. पक्षाचे प्रमुख एम. के. स्टॅलिन हे विधेयक संसदेत मांडल्यानंतर त्याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या विधेयकांवरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या हालचालींना वेग आला आहे. दोन्ही बाजूंनी बैठकांचे आयोजन करून आपापली रणनीती आखली जात आहे. आता विशेष अधिवेशनात ही विधेयके मांडली जाणार का आणि त्यांना संसदेत मंजुरी मिळणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. (Parliament Special Session 2026)





मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर