देवाभाऊंचे सरकार आणणार नवा कायदा;आता शिक्षकांची शाळाबाह्य कामांतून कायमची सुटका

    27-Nov-2026   

Maharashtra Teachers Non-Academic Duties Law
 
मुंबई, : (Maharashtra Teachers Non-Academic Duties Law) राज्यातील शिक्षकांवर असलेला अशैक्षणिक कामांचा ताण आता कायमचा कमी होणार आहे. शिक्षकांना या शाळाबाह्य कामांतून मुक्त करण्यासाठी राज्य सरकार आगामी हिवाळी अधिवेशनात एक नवा कायदा आणणार आहे. या निर्णयामुळे शिक्षकांना इतर सरकारी कामांऐवजी मुलांना शिकवण्यावर पूर्ण लक्ष देता येणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे २५ हजारांहून अधिक खासगी अनुदानित शाळांमधील २.७६ लाख शिक्षकांना आणि ९८ लाख विद्यार्थ्यांना होणार आहे.
 
या नव्या कायद्यानुसार जनगणना, निवडणुका आणि आपत्ती व्यवस्थापन ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय कामे सोडून इतर कोणतीही शाळाबाह्य कामे शिक्षकांना दिली जाणार नाहीत. तसेच, शाळांमधून शिक्षक, विद्यार्थी किंवा पालकांकडून कोणत्याही प्रकारचे पैसे किंवा निधी गोळा करण्यासही बंदी घातली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विविध सर्व्हे करणे आणि ऑनलाइन माहिती भरणे यांसारख्या कामांमुळे शिकवण्यात अडचणी येत होत्या. याविरोधात शिक्षक संघटनांनी अनेकदा आवाज उठवला होता. अखेर सरकारने याची दखल घेत हा मोठा निर्णय घेतला आहे.(Maharashtra Teachers Non-Academic Duties Law)
काय असणार नव्या कायद्यात?
 
अशैक्षणिक कामांवर बंदी: जनगणना, निवडणुका आणि आपत्ती व्यवस्थापन या राष्ट्रीय व अत्यावश्यक जबाबदार्‍यांव्यतिरिक्त इतर कोणतीही शाळाबाह्य कामे शिक्षकांना सोपविण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध घातला जाणार आहे.
 
निधी उभारणीस मनाई: शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी किंवा पालकांकडून कोणत्याही प्रकारचा निधी उभारण्यासही या निर्णयाद्वारे बंदी घालण्यात येणार आहे.
 
खासगी अनुदानित शाळांना मोठा फायदा: राज्यातील सुमारे २५ हजारांहून अधिक खासगी अनुदानित शाळांमधील २.७६ लाख शिक्षकांना आणि सुमारे ९८ लाख विद्यार्थ्यांना या कायद्याचा थेट फायदा होणार आहे.(Maharashtra Teachers Non-Academic Duties Law)
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर