भारतीय हवाई सुरक्षेत पाचवा ‘सितारा’ दाखल होणार! पाकिस्तानच्या हवाई धोक्यांना भारताचे ‘S-400’ कवच; LoC वर हवाई संरक्षण प्रणाली यंत्रणा तैनात होणार!

 
India Fifth S-400 Air Defence System
 
नवी दिल्ली (India Fifth S-400 Air Defence System) : पाकिस्तानकडून निर्माण होणाऱ्या हवाई धोक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पश्चिम सीमेवरील हवाई संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत करण्याची तयारी सुरू केली आहे. जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तानला लागून असलेल्या सुमारे ७४० किलोमीटर लांबीच्या नियंत्रण रेषेवर (LoC) पाचवी S-400 हवाई संरक्षण प्रणाली तैनात करण्याची योजना असल्याचे वृत्त आहे. यापुर्वी सीमाभागात वेग वेगळ्या ठिकाणी चार S-400 हवाई संरक्षण प्रणाली तैनात करण्यात आली होती.
 
मिळालेल्या वृत्तानुसार, भारतीय हवाई दलाची एक विशेष पथक पुढील महिन्यात रशियाला जाऊन या प्रणालीची प्री-डिस्पॅच तपासणी करणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी २०२७ पर्यंत ही प्रणाली तैनातीसाठी सज्ज होण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव या प्रणालीच्या तैनातीचे नेमके ठिकाण सार्वजनिक केले जाणार नाही. (India Fifth S-400 Air Defence System)
 
काय आहे S-400 हवाई संरक्षण प्रणाली?
 
रशियाने विकसित केलेली S-400 ‘ट्रायम्फ’ ही जगातील अत्याधुनिक लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक मानली जाते. २००७ मध्ये ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. शत्रूची लढाऊ विमाने, क्रूझ क्षेपणास्त्रे, काही प्रकारची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि इतर हवाई लक्ष्यांना अडवण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे.
 
या प्रणालीची प्रभावी मारक क्षमता वापरल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या प्रकारानुसार बदलते. काही क्षेपणास्त्रांच्या मदतीने सुमारे ४०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवरही कारवाई करता येते. त्यामुळे शत्रूच्या हवाई हालचालींवर दूरवरून लक्ष ठेवून संभाव्य धोके रोखण्यासाठी ही प्रणाली महत्त्वाची ठरते. (India Fifth S-400 Air Defence System)

भारताकडे आतापर्यंत चार S-400 प्रणाली
 
भारताने रशियासोबत केलेल्या करारानुसार पाच S-400 प्रणाली मिळणार आहेत. त्यापैकी चार प्रणाली भारताला मिळाल्या असून, त्या देशाच्या विविध सीमावर्ती भागांमध्ये तैनात करण्यात आल्याचे वृत्त आहे.
 
व २०२१ मध्ये भारताला पहिली S-400 प्रणाली मिळाली. ती पंजाबमध्ये तैनात करण्यात आली असून, पाकिस्तान आणि चीनकडून निर्माण होणाऱ्या हवाई धोक्यांवर लक्ष ठेवण्यास मदत करते. (India Fifth S-400 Air Defence System)
 
दुसरी प्रणाली : जुलै २०२२ मध्ये मिळालेली दुसरी प्रणाली सिक्कीम परिसरात चीन सीमेच्या दिशेने तैनात असल्याचे सांगितले जाते. या भागातून सिलीगुडी कॉरिडॉर अर्थात ‘चिकन नेक’ परिसराच्या सुरक्षेलाही महत्त्व आहे.
 
तिसरी प्रणाली : फेब्रुवारी २०२३ मध्ये भारताला तिसरी प्रणाली मिळाली. ती पश्चिम सीमेवरील हवाई संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी तैनात करण्यात आली. (India Fifth S-400 Air Defence System)
 
चौथी प्रणाली : मे-जून २०२६ दरम्यान भारताला चौथी प्रणाली मिळाल्याचे वृत्त आहे. ती आसाममध्ये तैनात करण्यात आली असून, अरुणाचल प्रदेशातील चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) सुरक्षेसाठी महत्त्वाची मानली जाते.
 
पाचवी प्रणाली तैनात झाल्यानंतर पाकिस्तानच्या दिशेने भारताची हवाई संरक्षण क्षमता आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
 
ऑपरेशन सिंदूरमध्ये ३१४ किलोमीटर अंतरावरून लक्ष्य भेदल्याचा दावा
 
मे २०२५ मध्ये झालेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान S-400 प्रणालीने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार, भारतीय हवाई दलाच्या S-400 प्रणालीने पाकिस्तानचे एक विशेष लष्करी विमान सुमारे ३१४ किलोमीटर अंतरावर असताना पाडले. या कारवाईला जगातील सर्वाधिक अंतरावरून करण्यात आलेल्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या कारवायांपैकी एक म्हणून अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. (India Fifth S-400 Air Defence System)
 
अहवालानुसार, संघर्षादरम्यान पाकिस्तानने आपली हवाई हद्द खुली ठेवली होती. त्यामुळे लष्करी आणि नागरी विमानांची एकाच वेळी आकाशात वर्दळ होती. अशा परिस्थितीत भारतीय हवाई दलाने हवाई संरक्षण यंत्रणेच्या मदतीने संभाव्य लक्ष्य ओळखले आणि S-400 प्रणालीद्वारे त्यावर कारवाई केली. या कारवाईमुळे भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेचे महत्त्व अधोरेखित झाले.
 
पाचव्या S-400 प्रणालीच्या प्रस्तावित तैनातीमुळे जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील हवाई संरक्षण अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे. मात्र, तैनातीचे नेमके ठिकाण आणि वेळापत्रक याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. (India Fifth S-400 Air Defence System)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर