नवी दिल्ली (Delimitation Bill 2026) : परिसीमन विधयकासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत लोकसभेतील जागांची संख्या सर्व राज्यांमध्ये ५० टक्क्यांनी वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार, राज्यांमधील लोकसभेच्या जागांचे सध्याचे परस्पर प्रमाण कायम ठेवण्याची तरतूद करण्यात येणार आहे. ही व्यवस्था २०५० पर्यंत कायम ठेवण्याचा विचार असल्याचे सांगण्यात येते.
संसदेचे विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबरपासून सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. या अधिवेशनात सरकारकडून महिला आरक्षण आणि परिसीमनाशी संबंधित विधेयकांमध्ये सुधारणा मांडल्या जाण्याची शक्यता आहे. (Delimitation Bill 2026)
VIDEO | Delhi: The Union Cabinet met here on Friday and is learnt to have cleared a fresh delimitation-linked women's reservation bill, which is likely to be brought before the special sitting of Parliament beginning next week.
Sources said the bill was brought before the special meeting of the Union Cabinet, which is expected to accord its nod to the fresh bill with some amendments to ensure that no state loses its representation in the Lok Sabha in proportion to other states after delimitation.
The Cabinet meeting was chaired by Prime Minister Narendra Modi and was convened at 1 pm at Sewa Teerth to discuss the bill, which the government is keen to get passed in the special sitting of Parliament starting Monday.
Source: PMO
परिसीमन प्रक्रियेमुळे दक्षिण भारतातील राज्यांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा ५० टक्क्यांनी वाढवून १९७१ च्या जनगणनेनुसार असलेले राज्यांमधील जागांचे परस्पर प्रमाण कायम ठेवण्याचा प्रस्ताव असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे लोकसभेतील जागांची संख्या वाढवतानाच राज्यांच्या प्रतिनिधित्वातील सध्याचे प्रमाण टिकवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महिला आरक्षण विधेयकात सुधारणा करण्याची तयारी
लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या उद्देशाने सरकारकडून यापूर्वी विधेयक आणण्यात आले होते. मात्र, एप्रिल २०२६ मध्ये संविधान (१३१वी सुधारणा) विधेयक लोकसभेत आवश्यक बहुमत मिळवू शकले नव्हते. त्यामुळे आता या विधेयकात सुधारणा करून पुन्हा संसदेत मांडण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जाते. (Delimitation Bill 2026)
यापूर्वीच्या विधेयकात महिला आरक्षणाची अंमलबजावणी परिसीमन प्रक्रियेशी जोडण्यात आली होती. तसेच लोकसभेची सध्याची ५४३ सदस्यसंख्या वाढवून कमाल ८५० करण्याचा प्रस्ताव होता.
संसदेच्या विशेष अधिवेशनाचे वेळापत्रक
संसदेचे विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेच्या बैठकीने सुरू होणार आहे, तर राज्यसभेचे कामकाज २ डिसेंबरपासून सुरू होईल. सरकारी कामकाजानुसार हे अधिवेशन ३ डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात परिसीमन आणि महिला आरक्षणाशी संबंधित प्रस्तावांवर सरकारची पुढील भूमिका स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. (Delimitation Bill 2026)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.