मुंबई (Mumbai Constitution Day Celebration): भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानातील लोकशाही मूल्ये, मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि राष्ट्राच्या एकात्मतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिका आयुक्त मा. श्रीमती अश्विनी भिडे जी तसेच मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (शहर) मा. श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगरे जी यांची भेट घेण्यात आली. यावेळी दोन्ही मान्यवरांना भारताचे संविधान सप्रेम भेट देऊन भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.
भारतीय संविधान हे आपल्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा भक्कम आधारस्तंभ असून, प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची हमी देणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार प्रदान करण्याबरोबरच देशाच्या एकात्मतेची आणि अखंडतेची जपणूक करण्याची प्रेरणा दिली आहे.(Mumbai Constitution Day Celebration)
संविधान दिन हा केवळ औपचारिक उत्सव नसून, संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे. संविधानातील तत्त्वांचे पालन करणे, लोकशाही मूल्यांचा आदर करणे आणि सामाजिक समतेसाठी योगदान देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
या भेटीच्या माध्यमातून भारतीय संविधानाप्रती आदर आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेली बांधिलकी व्यक्त करण्यात आली.(Mumbai Constitution Day Celebration)