लखनऊ (Congress-SP UP Election Seat Sharing) : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्ष (सपा) आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच दोन्ही पक्षांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. समाजवादी पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत काँग्रेसला २६ जागांचा प्रस्ताव दिल्याने काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "मला हे समजत नाही. हे माझ्या आकलनापलीकडचे आहे," अशा शब्दांत त्यांनी समाजवादी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
इम्रान मसूद म्हणाले की, जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेस पक्षानेच घ्यायला हवा. "आम्ही भिकारी आहोत का? तुम्ही आमच्याशी असे वागणार का? आम्ही जागा मागितल्याही नव्हत्या आणि तुम्ही थेट २६ जागा जाहीर केल्या. तुमची काम करण्याची पद्धत अशीच असेल आणि तुम्ही तुमच्या अटी आमच्यावर लादणार असाल, तर माझ्यासारख्या स्वाभिमानी माणसाला हे मान्य होणार नाही," अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. (Congress-SP UP Election Seat Sharing)
Lucknow, Uttar Pradesh: On the Samajwadi Party releasing its first list of candidates for the Uttar Pradesh Assembly polls amid seat-sharing talks, Congress MP Imran Masood says, "...I don't understand it. It's beyond my understanding; the party has to take a decision on this, I don't understand. Are we beggars? Will you treat us like this- that we aren't even asking you for seats and you declared 26 seats? We didn't even demand seats from you. So if this is your way of working, that you will dictate terms, then a self-respecting person like me does not understand these things."
सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी दिल्लीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या प्रतिनिधींमध्ये जागावाटपाबाबत चर्चा झाली होती. यावेळी समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांनी काँग्रेसला २६ जागांची यादी देणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मंगळवारी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, "आम्ही जिंकण्याची क्षमता असलेल्या २६ जागांपासून सुरुवात केली आहे. परस्पर सामंजस्याने पुढे जाऊ," असे म्हटले. (Congress-SP UP Election Seat Sharing) काँग्रेससाठी कोणत्या २६ जागांचा विचार?
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेससाठी रामपूर खास, फरेंदा, मथुरा, खेरागढ, जगदीशपूर, किदवई नगर, बागपत, मोदीनगर, हापूर, जेवर, स्याना, खुर्जा, खैर, इगलास, मांट, आग्रा उत्तर, फतेहपूर सिक्री, बिलग्राम-मल्लावन, नानपारा, गोविंदनगर, गोरखपूर शहर, खजनी, पडरौना, फाजिलनगर, पिंडरा आणि वाराणसी कँट या २६ जागांचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी समाजवादी पक्षाने काँग्रेसला कथितपणे ५४ जागांची यादी दिल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित झाली होती. त्या यादीतही यापैकी काही जागांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधला जाणार की मतभेद आणखी वाढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Congress-SP UP Election Seat Sharing)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.