दुष्काळी संकटात शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य! ४२ लाख शेतकऱ्यांना लाभ, नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५,५४८ कोटींची तरतूद; मंत्रिमंडळाचा निर्णय!

    25-Nov-2026
 
 Maharashtra Government Decisions
 
मुंबई (Maharashtra Government Decisions) : राज्यातील ४२ लाख ३० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मोफत धान्य देण्यासह नंदुरबारमधील नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५ हजार ५४८ कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाने बुधवार, दि, २५ नोव्हेंबर रोजी मंजुरी दिली. आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापन करण्याचा तसेच महसूल न्यायालयीन कामकाजात सुधारणा करण्याचाही निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाने मंत्रिमंडळाच्या १४ निर्णयांची माहिती दिली.
 
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्र्यरेषेखालील, मात्र डीबीटी योजनेत समाविष्ट नसलेल्या ३३ जिल्ह्यांतील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिने प्रतिमाणशी पाच किलो मोफत धान्य मिळणार आहे. यात तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गव्हाचा समावेश असेल. (Maharashtra Government Decisions)
 
नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५ हजार ५४८ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. सहा वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून २६ हजार ५२६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार असून, ११.५० मेगावॅट वीज निर्मितीही होणार आहे. (Maharashtra Government Decisions)
 
आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. प्रकरणांचा ९० दिवसांत निपटारा करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली.
 
महसूल विभागातील अर्धन्यायिक प्रकरणांसाठी महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणाली लागू होणार आहे. तसेच प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ‘एक जिल्हा, एक अपील’ ही तरतूद लागू करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. (Maharashtra Government Decisions)
 
इतर महत्त्वाचे निर्णय
 
विद्यार्थ्यांना दिलासा : ईबीसी, एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गांतील आरोग्य विज्ञान पदवीच्या विद्यार्थ्यांच्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्त्यात वाढ.
 
शिक्षकांसाठी सुविधा : शालार्थ प्रणालीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरबीआयकडे नोंदणीकृत बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमार्फत आर्थिक सुविधा.

खासगी शाळांसाठी कायदा : खासगी अनुदानित शाळांच्या विनियमनासाठी स्वतंत्र विधेयकाच्या प्रारूपास मंजुरी. (Maharashtra Government Decisions)
 
विद्यापीठ कायद्यात सुधारणा : रामटेक संस्कृत विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिनियमांत सुधारणा.
 
कामगार कायदे : माथाडी कामगार आणि खासगी सुरक्षा रक्षकांच्या कल्याणविषयक कायद्यांत सुधारणा. (Maharashtra Government Decisions)
 
ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग : अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयांतील ग्रंथपालांना सुधारित वेतनश्रेणी. (Maharashtra Government Decisions)

इतर सुधारणा : मुद्रांक अधिनियम, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आणि अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीसंदर्भातील कायद्यात सुधारणा.
 
नागपूरला जमीन : मौदा नगर पंचायतीला शासकीय जमीन देण्यास मंजुरी; प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा. (Maharashtra Government Decisions)





संबंधित मजकूर