उंबरमाळी स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून एसटी चालक-वाहकाच्या तत्परतेचे कौतुक

ST Bus Helps Stranded Passengers at Umbermali Station 
 
मुंबई, (ST Bus Helps Stranded Passengers at Umbermali Station) :मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील वाहतूक काल रात्री ९ वाजल्यापासून विस्कळीत झाल्याने उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी अडकून पडले होते. रात्रीची वेळ आणि प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये, विशेषतः महिला व महाविद्यालयीन तरुणींमध्ये चिंतेचे वातावरण होते.
 
अशा परिस्थितीत कसारा येथे थांबलेली एसटी बस प्रवाशांच्या मदतीसाठी तातडीने उंबरमाळी स्थानकावर पोहोचली. एसटी चालक किरण खांडवी आणि वाहक राकेश पत्की यांच्या तत्परतेमुळे अनेक प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा आधार मिळाला. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विशेष कौतुक केले.(ST Bus Helps Stranded Passengers at Umbermali Station)
 
रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यामुळे उंबरमाळी स्थानकावरनोकरदार, विद्यार्थी, महिला आणि अन्य प्रवासी अडकले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कसारा येथे थांबलेल्या एसटी बसचे चालक किरण खांडवी आणि वाहक राकेश पत्की यांनी आगारातील बसस्थानक प्रमुखांना याबाबत माहिती दिली. तसेच अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी बस पाठविण्याची विनंती केली. बसस्थानक प्रमुख श्रीमती पूनम देशमुख यांनी परिस्थितीची खातरजमा केल्यानंतर लालपरी तातडीने उंबरमाळी स्थानकाकडे रवाना करण्यात आली.
 
रात्रीच्या वेळी एसटी बस मदतीला धावून आल्याने स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. बसमध्ये महाविद्यालयीन तरुणी आणि नोकरदार महिलांची संख्या लक्षणीय होती. सुरक्षित प्रवासाची व्यवस्था झाल्याचे समजताच अनेकांनी आपल्या पालकांना फोन करून एसटी बस मदतीला आल्याची माहिती दिली. त्यामुळे प्रवाशांसह त्यांच्या कुटुंबीयांची चिंता दूर झाली. प्रवाशांनी चालक आणि वाहकाचे आभार मानले. त्यानंतर बस सर्व प्रवाशांना घेऊन नाशिकच्या दिशेने रवाना झाली.(ST Bus Helps Stranded Passengers at Umbermali Station)
 
या घटनेची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालक किरण खांडवी, वाहक राकेश पत्की आणि संबंधित एसटी प्रशासनाचे अभिनंदन केले. ‘एसटी महामंडळ ही केवळ प्रवासी वाहतुकीची सेवा नसून, अडचणीच्या प्रसंगी सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारी विश्वासाची यंत्रणा आहे. प्रवाशांच्या अडचणीचे गांभीर्य ओळखून तत्परतेने मदतीचा हात देणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे महामंडळाची सेवाभावी परंपरा अधिक दृढ होत आहे,’ असे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.
 
प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा यांना सर्वोच्च प्राधान्य देत संकटसमयी मदतीसाठी पुढाकार घेणे, हीच एसटीची खरी ओळख आहे. किरण खांडवी आणि राकेश पत्की यांनी आपल्या कृतीतून कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला आहे, अशा शब्दांत मंत्री सरनाईक यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.(ST Bus Helps Stranded Passengers at Umbermali Station)
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर