ट्रोलिंगवर भडकले सलमान खान; म्हणाले, ‘माझी खिल्ली उडवली तर...’; श्रद्धा कपूरचीही मागितली माफी!

 
Salman Khan Trolling Controversy
 
मुंबई (Salman Khan Trolling Controversy) : अभिनेता सलमान खानने त्याच्या आगामी ‘मातृभूमि : मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटामुळे सोशल मीडियावरील ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे. आपली खिल्ली उडवून काही लोकांना व्ह्यूज आणि प्रसिद्धी मिळत असेल, तर मी आनंदी असल्याचे सलमानने स्पष्ट केले. तसेच अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ या चित्रपटाशी आपल्या चित्रपटाची रिलीज डेट एकाच दिवशी येत असल्याने त्याने तिची माफी मागितल्याचेही सांगितले.
 
शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी एबीपीच्या ‘रायझिंग समिट २०२६’मध्ये सहभागी झालेल्या सलमान खानने ‘बिग बॉस’च्या एका भागात रागाच्या भरात शर्ट काढण्यामागचे कारण सांगितले. तो म्हणाला की, शर्ट काढण्याचा निर्णय हा क्षणिक आवेगातून घेतला होता. सध्या सोशल मीडियावर नकारात्मकता चालत आहे, सध्या नकारात्मकतेला सकारात्मकतेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत असल्याचा नवीन ट्रेंड सुरू आहे. काही जण नकारात्मक गोष्टी करून पैसे आणि फॉलोअर्स मिळवत असतील, तर त्यांना तसे करू द्या. (Salman Khan Trolling Controversy)

‘माझी खिल्ली उडवून प्रसिद्धी मिळत असेल, तर आनंदच आहे!’
 
सलमानने पुढे सांगितले की, सध्या सोशल मीडियावर ‘आम्हाला भाई पुन्हा पूर्वीसारखा हवा आहे’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. त्याने यापूर्वी चांगले चित्रपट केले असले, तरी मागील पाच-सहा चित्रपटांमध्ये त्याची ऊर्जा कमी झाल्याची टीका केली जात आहे. ‘भाईला आता चित्रपटात रस राहिलेला नाही’, ‘भाईने मित्रांचे ऐकू नये’ अशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
 
यावर बोलताना सलमान म्हणाला, “तुम्ही माझ्याबद्दल बोलत आहात, ही चांगली गोष्ट आहे. माझी निंदा करून तुम्हाला सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि फॉलोअर्स मिळत असतील, तर मला त्यात काहीच अडचण नाही. यातून तुम्हाला रोजगार मिळत असेल, तर तुम्ही जे करायचे ते करा.” (Salman Khan Trolling Controversy)

श्रद्धा कपूरच्या चित्रपटाशी क्लॅश होणार असल्याने सलमानला खेद
 
सलमानचा ‘मातृभूमि : मे वॉर रेस्ट इन पीस’ हा चित्रपट ४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी श्रद्धा कपूरचा ‘ईठा’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. या प्रदर्शनाच्या तारखांमधील संघर्षाबद्दल सलमानने खेद व्यक्त केला.
 
माध्यमांसाठी आयोजित स्क्रीनिंगदरम्यान चित्रपटातील व्हीएफएक्समध्ये काही त्रुटी दिसून आल्याने प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. तसेच २७ नोव्हेंबरला सूरज बडजात्या यांचा आणि त्यानंतर सनी देओल यांचा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने ४ डिसेंबर ही तारीख निश्चित केल्याचेही त्याने स्पष्ट केले. (Salman Khan Trolling Controversy)
 
याशिवाय, २४ डिसेंबरला शाहरुख खानचा ‘किंग’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शाहरुख आणि त्याची मुलगी सुहाना यांच्या चित्रपटाशी आपला चित्रपट प्रदर्शित व्हावा, असे आपल्याला वाटत नसल्याचे सलमानने सांगितले. जानेवारीमध्ये विकी कौशल, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपट येणार आहे, तर एप्रिलमध्ये ‘मॉन्स्टर’ प्रदर्शित होणार असल्याने त्या चित्रपटांशीही क्लॅश टाळायचा असल्याचे त्याने नमूद केले.
 
सलमान म्हणाला, “चित्रपटाची रिलीज डेट जाहीर होईपर्यंत मला श्रद्धाच्या चित्रपटाबद्दल माहिती नव्हती. याबद्दल मला खूप वाईट वाटते. आधी माहिती असती, तर मी श्रद्धाच्या चित्रपटासोबत माझा चित्रपट कधीच प्रदर्शित केला नसता. मी तिला लहानपणापासून पाहिले आहे. मी तिला फोन करून माफी मागितली. त्यावर तिने ‘नाही सर, काही हरकत नाही’ असे सांगितले.” (Salman Khan Trolling Controversy)




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर