पंतप्रधान मोदींच्या हस्ते SCO सभ्यता संवाद मंचाचे उद्घाटन! २५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित; ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच पाकिस्तानी मंत्र्याचे भारतात आगमन!

 
SCO Civilizational Dialogue Forum 2026
 
नवी दिल्ली (SCO Civilizational Dialogue Forum 2026) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, दि, २० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील ऐतिहासिक किल्ल्या जवळ पहिल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) ‘सिव्हिलायझेशनल डायलॉग फोरम’चे उद्घाटन केले. २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेचे आयोजन केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
 
विशेष म्हणजे, ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच पाकिस्तानच्या एका मंत्र्याने भारताला भेट दिली आहे. पाकिस्तानचे हवामान बदल आणि पर्यावरण समन्वय मंत्री मुसादिक मसूद मलिक यांनी पाकिस्तानी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. (SCO Civilizational Dialogue Forum 2026)
 
चीन, इराणसह २५ देशांचा सहभाग
 
या परिषदेत चीन आणि इराणसह एकूण २५ देश सहभागी झाले आहेत. सदस्य देशांमधील सामायिक सभ्यता आणि सांस्कृतिक वारसा अधोरेखित करणे, तसेच परस्पर संवाद आणि सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
 
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी १३ नोव्हेंबर रोजी दिलेल्या माहितीनुसार, भारताने चीन, कझाकस्तान, इराण, किर्गिझ रिपब्लिक, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, बेलारूस, अझरबैजान, आर्मेनिया, बहरीन, नेपाळ, सौदी अरेबिया, कंबोडिया, तुर्की आणि श्रीलंका यांसह २५ देशांना निमंत्रणे पाठवली होती. (SCO Civilizational Dialogue Forum 2026)
 
पाकिस्तानच्या सहभागाबाबत बोलताना शेखावत यांनी पाकिस्तानही या परिषदेत सहभागी होईल, अशी आशा व्यक्त केली होती. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांची संस्कृती आणि सभ्यता एकत्र विकसित झाली आहे. १९४७ च्या फाळणीमुळे दोन्ही देश वेगळे झाले असले, तरी त्यांचा सामायिक सांस्कृतिक वारसा आजही कायम असल्याचे त्यांनी नमूद केले होते.
 
SCO हे व्यासपीठ केवळ राजकारण आणि अर्थकारणापुरते मर्यादित न राहता, सांस्कृतिक आणि मानवी मूल्यांवर संवाद साधण्याचे माध्यम बनावे, अशी भारताची भूमिका आहे. यामुळे सदस्य देशांमधील तसेच त्यांच्या नागरिकांमधील परस्पर संबंध आणि सामंजस्य अधिक दृढ होण्यास मदत होईल, असेही शेखावत यांनी सांगितले होते. (SCO Civilizational Dialogue Forum 2026)
 
पाकिस्तानकडून सांस्कृतिक मंत्र्यांऐवजी हवामान मंत्र्यांची नियुक्ती
 
या मंचासाठी भारताने पाकिस्तानचे राष्ट्रीय वारसा आणि संस्कृती मंत्री औरंगजेब खान खिची यांना निमंत्रित केले होते. मात्र, पाकिस्तानने त्यांच्या जागी हवामान बदल आणि पर्यावरण समन्वय मंत्री डॉ. मुसादिक मसूद मलिक यांची शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्ती केली. (SCO Civilizational Dialogue Forum 2026)
 
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी शिष्टमंडळ फोरमच्या वरील विविध विषयांवरील चर्चांमध्ये सहभागी होणार आहे. तसेच SCOच्या अन्य सदस्य देशांच्या प्रतिनिधींशी स्वतंत्र चर्चाही करणार आहे.
 
मे २०२३ मध्ये तत्कालीन पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी गोव्याला भेट दिल्यानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. बिलावल भुट्टो यांनी त्यावेळी SCOच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला होता. (SCO Civilizational Dialogue Forum 2026)
 
किल्ल्यातून ३,२०० वर्षांच्या इतिहासाचे दर्शन
 
या फोरमच्या निमित्ताने दिल्लीतील एतिहासीक किल्ला येथे 'अस्तित्व- द एसेंस ऑफ आवर एग्जिस्टेंस' या शीर्षकाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पुरातत्त्वीय अवशेष, कलावस्तू आणि वास्तुकलेच्या माध्यमातून इसवी सनपूर्व १२०० ते इसवी सन १२०० या कालखंडातील दिल्लीचा इतिहास या प्रदर्शनातून उलगडण्यात येणार आहे. (SCO Civilizational Dialogue Forum 2026)
 
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) संग्रहालयाचे संचालक वसंत स्वर्णकर यांच्या मते, किल्ल्याच्या परिसरात सुमारे तीन हजार वर्षांपासून मानवी वस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. येथील उत्खननात मौर्यपूर्व, महाजनपद, मौर्य, शुंग, कुशाण, गुप्तोत्तर, राजपूत, सल्तनत आणि मुघल काळातील अवशेष आढळले आहेत. (SCO Civilizational Dialogue Forum 2026)
 
संवाद मंचासाठी पुराणा किल्ल्याचीच निवड का?
 
दिल्लीतील किल्ला हा प्राचीन इंद्रप्रस्थाशी संबंधित असल्याचे मानले जाते. या परिसरात विविध ऐतिहासिक कालखंडांतील संस्कृतींचे अवशेष आढळले आहेत. त्यामुळे भारताच्या सांस्कृतिक आणि सभ्यताविषयक प्रवासाचे अनेक पैलू या ठिकाणी अनुभवता येतात. (SCO Civilizational Dialogue Forum 2026)
 
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या मते, भारताच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारे हे महत्त्वाचे ठिकाण असल्यानेच या परिषदेच्या आयोजनासाठी या किल्ल्याची निवड करण्यात आली.
 
ASI संग्रहालयाचे संचालक वसंत स्वर्णकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील उत्खननात प्राचीन भारताचे आजच्या SCO सदस्य देशांमधील प्रदेशांशी व्यापारी संबंध असल्याचे संकेतही मिळाले आहेत. त्यामुळे हा किल्ला केवळ भारताच्या इतिहासाचा साक्षीदार नसून, प्राचीन काळापासून विविध प्रदेशांमध्ये असलेल्या सांस्कृतिक आणि व्यापारी संबंधांचीही आठवण करून देणारा ठरतो. (SCO Civilizational Dialogue Forum 2026)





मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर