नाशिक : (Rameshrao Gaidhan Death)राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) पूर्व जिल्हा कार्यवाह आणि नाशिक महानगरातील ज्येष्ठ संघ कार्यकर्ते रमेशराव गायधनी (77) यांचे शुक्रवारी दुपारी अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी येथील अमरधाममधील विद्युत दाहिनीमध्ये सायंकाळी 5 वाजता समाजातील अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने नाशिकच्या सामाजिक व संघ वर्तुळातील एक आधारस्तंभ हरविल्याची भावना आहे.
रमेशराव गायधनी यांचे संघ वर्तुळासह नाशिकच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी संघाच्या विविध जबाबदाऱ्या अत्यंत समर्थपणे पार पाडल्या. यामध्ये संघाचे शारीरिक प्रमुख, शहर कार्यवाह आणि जिल्हा कार्यवाह या पदासह विविध भूमिकेत योगदान दिले. आणीबाणीच्या काळात त्यांनी १९ महिने कारावास भोगला होता.(Rameshrao Gaidhan Death)
रविवार कारंजा परिसरातील त्यांचे निवासस्थान हे अनेक वर्षे संघ परिवारातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या संपर्काचे केंद्र राहिले. त्यांनी आपल्या घराच्या एका भागातूनच दीर्घकाळ संघ कार्यालयाचे कामकाज सांभाळले. सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख सचिव सुरेश गायधनी यांचे ते बंधू होते.(Rameshrao Gaidhan Death)