चेन्नई (Chennai Heroin Drug Seizure 2026) : वैद्यकीय बिले भरण्याच्या आमिषाने एका आईस्क्रीम विक्रेत्याला अमली पदार्थांच्या तस्करीच्या जाळ्यात ओढण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चेन्नईमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मंगळवारी ७१.२४ किलो हेरॉईन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमली पदार्थांची किंमत सुमारे १४० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. २०२६ या वर्षातील देशभरातील DRIची ही सर्वात मोठी हेरॉईन जप्ती असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
आईस्क्रीम व्हॅनच्या फ्रीजरमध्ये लपवले होते हेरॉईन
DRIच्या अधिकाऱ्यांनी मंगळवार, दि, १७ नोव्हेंबर रोजी रात्री चेन्नईमध्ये एका आईस्क्रीम व्हॅनची तपासणी केली. या व्हॅनमध्ये असलेल्या दोन फ्रीजरमध्ये तीन गोण्यांत लपवून ठेवलेली हेरॉईनची ६९ पाकिटे आढळली. या व्हॅनमधून ७१.२४ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. थैनी जिल्ह्यातील ए. अब्दुल सुक्कूर हा व्हॅन चालवत होता, तर त्याचा सहआरोपी आणि मेहुणा के. शफीक अहमद हा क्रमांकफलक नसलेल्या दुचाकीवरून व्हॅनच्या पुढे जात होता. त्रिचीमार्गे सागरी मार्गाने श्रीलंकेत पाठवण्याची योजना असल्याचे सांगितले जाते. (Chennai Heroin Drug Seizure 2026)
वैद्यकीय खर्चासाठी मिळाली ५० हजारांची मदत
सुक्कूर हा रामनाथपुरम जिल्ह्यात आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करत होता. अमली पदार्थ वाहून नेण्यासाठी त्याने यापूर्वी किमान पाच वेळा कोलंबोचा प्रवास केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अलीकडेच त्याने त्याच आईस्क्रीम व्हॅनच्या माध्यमातून चेन्नईमध्ये व्यवसाय सुरू केला होता. ही व्हॅन त्याच्या कुटुंबातील एका सदस्याच्या नावावर खरेदी करण्यात आली होती. (Chennai Heroin Drug Seizure 2026)
DRIच्या सूत्रांनुसार, काही महिन्यांपूर्वी सुक्कूरला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्याला मध्य चेन्नईतील एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने उपचारांचा खर्च भागवताना त्याच्या कुटुंबाची मोठी अडचण झाली. त्याचा क्रेडिट स्कोअरही कमी असल्याने व्हॅन कुटुंबातील दुसऱ्या सदस्याच्या नावावर खरेदी करण्यात आली होती. त्या सदस्याला कथित तस्करीतील त्याच्या भूमिकेची माहिती नसल्याचे सांगितले जा.
याच काळात उत्तर चेन्नईमध्ये कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीच्या नेटवर्कमधील एका स्थानिक सूत्रधाराने सुक्कूरला ५० हजार रुपयांची मदत केली. ही रक्कम त्याचा मेहुणा अहमद याच्यामार्फत देण्यात आली होती. कठीण काळात मदत केल्यामुळे सुक्कूरने त्या व्यक्तीशी निष्ठा ठेवली आणि त्यानंतर त्याला अमली पदार्थांची वाहतूक करण्याच्या कामात सहभागी करण्यात आल्याचा आरोप आहे. (Chennai Heroin Drug Seizure 2026)
तीन लाख रुपयांचे आमिष
काही आठवड्यांपूर्वी सुक्कूरला हेरॉईनची मोठी खेप त्रिचीपर्यंत पोहोचवण्याचे काम देण्यात आले होते. या कामासाठी त्याला तीन लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पैशांची देवाणघेवाण आणि सूचना अहमदमार्फत दिल्या जात होत्या. अहमदलाही या व्यवहारातील एक तृतीयांश हिस्सा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यापैकी ५० हजार रुपये आगाऊ देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Chennai Heroin Drug Seizure 2026)
दोघांना अटक; तस्करीच्या सूत्रधाराचा शोध सुरू
मंगळवारी दोन्ही आरोपींनी चेन्नईच्या वायव्येकडील सुमारे १७ किलोमीटर अंतरावरील ठिकाणाहून एका महागड्या गाडीतून अमली पदार्थांची खेप घेतली होती. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवलेले हे अमली पदार्थ ६९ पाकिटांमध्ये विभागले होते. त्यापैकी काही पाकिटे कापडात गुंडाळण्यात आली होती, तर काही रबरच्या फुग्यांमध्ये लपवण्यात आली होती. (Chennai Heroin Drug Seizure 2026)
DRIने ही खेप अडवून सुक्कूर आणि अहमद या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन वाहने आणि तस्करीच्या नेटवर्कशी झालेल्या संवादाचे महत्त्वाचे तपशील असलेले तीन मोबाइल फोनही जप्त करण्यात आले. या प्रकरणातील स्थानिक सूत्रधार, अमली पदार्थांचा मूळ पुरवठादार आणि अन्य साथीदारांचा शोध DRIकडून सुरू आहे.
यापूर्वीही केली होती अमली पदार्थांची वाहतूक
चौकशीदरम्यान सुक्कूरने यापूर्वी चेन्नईहून त्रिचीपर्यंत पाच किलो हॅशिश ऑइलची वाहतूक केल्याची माहिती समोर आली आहे. या कामासाठी त्याला पाच हजार रुपये कमिशन मिळाले होते. तसेच, अहमदने चौकशीदरम्यान सुक्कूरसोबत परकीय चलन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तस्करी करण्यासाठी वाहक म्हणून काम केल्याचा अनुभव असल्याचे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Chennai Heroin Drug Seizure 2026)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.