अमित देशमुखांचे 'टिप्या'समोर लोटांगण! लातूरच्या कार्यक्रमात उदात्तीकरण करत प्रतिमेसमोर केले पुष्पार्पण

    19-Nov-2026   
 
Amit Deshmukh Tipu Sultan Controversy
 
मुंबई (Amit Deshmukh Tipu Sultan Controversy) : क्रूरकर्मा जिहादी टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. लातूरमध्ये बुधवारी आयोजित जयंती कार्यक्रमाला काँग्रेसचे आमदार अमित देशमुख उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी टिपू सुलतानच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या या कृतीवरून संतापाचा लाट उसळल्याचे पाहायला मिळते आहे. भाजपने याप्रकरणी तीव्र आक्षेप घेतला असून टिपू सुलतान कधीही देशाचा आदर्श असू शकत नाही, अशी भूमिका भाजपने मांडली आहे.
 
अमित देशमुख यांनी फेसबुकवर या कार्यक्रमाची छायाचित्रे आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. मंगळवारी सायंकाळी लातूर येथे ‘शेर-ए-हिंद शहीद हजरत टिपू सुलतान सार्वजनिक जयंती समारोह समिती’च्या वतीने आयोजित भव्य कव्वाली कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार शिवाजी काळगे आणि अन्य सहकारीही उपस्थित होते. कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या कव्वालींचे कौतुक करत त्यांनी या सादरीकरणाचा आनंद घेतल्याचे सांगितले. (Amit Deshmukh Tipu Sultan Controversy)
 
अमित देशमुख यांनी आपल्या पोस्टमध्ये टिपू सुलतानचा उल्लेख ‘शेर-ए-हिंद’ आणि ‘शहीद हजरत टिपू सुलतान’ असा केला आहे. मुंबईचे प्रसिद्ध कव्वाल अजीम नाजा यांनी आपल्या दमदार आवाजातून आणि हृदयस्पर्शी गायनातून उपस्थितांची मने जिंकली, असे त्यांनी म्हटले आहे. कव्वालीच्या माध्यमातून टिपू सुलतान यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचेही स्मरण करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम असल्याचेही त्यांनी नमूद केले. देशमुख यांच्या या कार्यक्रमातील सहभागावरून आणि टिपू सुलतानला अभिवादन केल्यावरून भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत.

हे त्यांचे लांगूलचालनाचे राजकारण
 
अमित देशमुख यांच्याकडून आणखी काय अपेक्षा ठेवणार? हीच काँग्रेसची संस्कृती आहे. हे त्यांचे लांगूलचालनाचे राजकारण आहे. नव्या पिढीतील नेते म्हणून अमित देशमुख यांनी टिपू सुलतान कोण होते, ते कुठून आले आणि त्यांचा भारताशी काय संबंध होता, हे त्यांनी जाणून घेतले पाहिजे. टिप्याच्या छायाचित्राला पुष्प अर्पण करणे हा हिंदू समाज, भारत आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. अशा प्रकारच्या लांगूलचालनाच्या राजकारणामुळे काँग्रेसची स्थिती सातत्याने खालावत चालली आहे. - श्रीकांत भारतीय, भाजप विधान परिषद सदस्य (Amit Deshmukh Tipu Sultan Controversy)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर