सोनिया गांधींच्या पुस्तकाविरोधात शिवसेनाच आक्रमक! पुस्तक फाडून निषेध; स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी खोटे कथन पसरवल्याचा आरोप!

बीआरएस अन् वायएसआर काँग्रेसचीही नाराजी!

 
Sonia Gandhi Book Controversy
 
मुंबई (Sonia Gandhi Book Controversy) : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव' या पुस्तकावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी या पुस्तकाचा तीव्र निषेध करत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासाठी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत पुस्तकाची पाने फाडून आपला निषेध व्यक्त केला. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मराठी अस्मितेचा अपमान करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
 
दरम्यान, काँग्रेसचे माजी मित्रपक्ष असलेल्या वायएसआर काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीनेही (बीआरएस) पुस्तकातील मजकुरावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या पुस्तकावरून राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Sonia Gandhi Book Controversy)
 
शिवसेनेच्या नाराजीची दोन प्रमुख कारणे!
 
शिवसेनेने पुस्तकातील काही उल्लेखांवर आक्षेप घेतला आहे. विशेषतः पुस्तकाच्या पान क्रमांक २०१ वर सावरकरांविषयी करण्यात आलेले भाष्य आणि पान क्रमांक ४४३ वर हिंदू वर्चस्ववादाचा करण्यात आलेला उल्लेख यावर पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. (Sonia Gandhi Book Controversy)
 
पुस्तकात सावरकरांविषयी खोटे कथन पसरवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही पक्षाने केला आहे.
 
वायएसआर काँग्रेसचा आक्षेप; राजशेखर रेड्डींच्या योगदानाचा उल्लेख नसल्याची नाराजी!
 
वायएसआर काँग्रेसचे खासदार मडिला गुरुमूर्ती यांनीही पुस्तकातील मजकुरावर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोनिया गांधी आपल्या पुस्तकात वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष कसे करू शकतात, असा सवाल त्यांनी केला. (Sonia Gandhi Book Controversy)
 
राजशेखर रेड्डी यांनी पदयात्रेच्या माध्यमातून आंध्र प्रदेशात काँग्रेस पक्ष मजबूत केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने २००४ आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवले. तसेच केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) सरकार स्थापन होण्यामध्येही त्यांच्या योगदानाचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांच्या योगदानाचा पुस्तकात उल्लेख नसल्याबद्दल गुरुमूर्ती यांनी नाराजी व्यक्त केली. (Sonia Gandhi Book Controversy)

बीआरएसचा आरोप; सोनिया गांधींच्या पुस्तकात तेलंगणाचा उल्लेखच नाही!
 
भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) कार्याध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मंत्री के. टी. रामाराव यांनीही सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर आक्षेप घेतला आहे. सोनिया गांधी यांच्या मनात तेलंगणाला स्थान नसल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्या पुस्तकात सोनिया गांधी यांनी तेलंगणाचा साधा उल्लेखही केलेला नाही, असे रामाराव म्हणाले.
 
एकीकडे शिवसेनेकडून सावरकर आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून पुस्तकबंदीची मागणी होत असताना, दुसरीकडे वायएसआर काँग्रेस आणि बीआरएसकडूनही आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या पुस्तकावरून विविध राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. (Sonia Gandhi Book Controversy)





मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर