भोपाळ (Seoni Police Extortion Scandal) : पोलिसांच्या वर्दीला काळीमा फासणारे गंभीर प्रकरण मध्य प्रदेशातील सिवनी येथे समोर आले आहे. मध्य प्रदेशच्या बाबरिया रोडवरील सिद्धार्थ हॉटेलमध्ये मुक्कामासाठी येणाऱ्या तरुण-तरुणींना गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन हॉटेलचालकाकडे दरमहा ५० हजार रुपयांची कथित मागणी केल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी कठोर भूमिका घेतली आहे. प्रथमदर्शनी पोलिसांचे संशयास्पद वर्तन समोर आल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी), उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीओपी) यांच्यासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. (Seoni Police Extortion Scandal)
हॉटेलचालकाचा पोलिसांवर वसुलीचा आरोप!
हॉटेलचालक संजय सनोडिया यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी सतीश तिवारी, एसडीओपी चंचलेश मरकाम आणि वाहतूक निरीक्षक विजय तिवारी हे दरमहा ५० हजार रुपयांची मागणी करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Seoni Police Extortion Scandal)
हॉटेलमध्ये मुक्कामासाठी येणाऱ्या सज्ञान तरुण-तरुणींच्या बॅगेत गांजा ठेवून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (Seoni Police Extortion Scandal)
सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलीस कर्मचारी दिसले!
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एएसपी दीपक मिश्रा, एसडीओपी चंचलेश मरकाम, कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी सतीश तिवारी, हेड कॉन्स्टेबल नवीन तिवारी, एएसपी यांचे चालक सलमान खान आणि गनमॅन कृष्णा तिवारी हे हॉटेलच्या आत दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Seoni Police Extortion Scandal)
याशिवाय, काही दिवसांपूर्वी हॉटेल भाड्याने चालवणाऱ्या एका तरुणानेही पोलीस अधिकाऱ्यांवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. या घटनांमुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
प्रकरण समोर आल्यानंतर सिवनीचे पोलीस अधीक्षक कृष्ण लालचंदानी यांनी कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी सतीश तिवारी यांची पोलीस मुख्यालयात बदली (लाइन अटॅच) केली होती. तसेच संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्तक्षेपानंतर एएसपी आणि एसडीओपी यांच्यासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Seoni Police Extortion Scandal)
'खाकी वर्दीतील गैरवर्तन खपवून घेणार नाही'; मुख्यमंत्र्यांचा इशारा!
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत या प्रकरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांच्या वर्दीत असताना शिस्तभंग आणि गैरवर्तन कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (Seoni Police Extortion Scandal)
पोलीस दलात शिस्त, उत्तरदायित्व आणि कर्तव्यनिष्ठा सर्वोच्च असली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने जबाबदारीने, मर्यादेचे पालन करून आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.
सरकार गैरवर्तनाच्या प्रकरणांमध्ये जीरो टॉलरेंसचे धोरण अवलंबत असून, चौकशीत दोषी आढळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिला. (Seoni Police Extortion Scandal)