नवी दिल्ली (Rahul Gandhi Mir Jafar Controversy) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेवर उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपने राहुल गांधी यांना थेट 'भारताचे मीर जाफर' असे संबोधत परदेशात भारतविरोधी प्रचार करत असल्याचा आरोप केला आहे.
राहुल गांधी यांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात भारतीय अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केले होते. त्यांच्या या विधानांवर भाजपच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला. परदेशी भूमीवर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत असल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केला. (Rahul Gandhi Mir Jafar Controversy)
नेमके काय म्हणाले राहुल गांधी ?
मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी कोलंबिया विद्यापीठातील कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी भारत आर्थिक संकटाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे विधान केले होते. देशातील तरुणांमध्ये वाढत असलेली बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी यांचा उल्लेख करत त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्न उपस्थित केले होते. (Rahul Gandhi Mir Jafar Controversy)
परदेशात भारताची बदनामी केल्याचा आरोप!
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्या विधानांवर जोरदार टीका केली. परदेशी भूमीवर भारताची बदनामी करण्यासाठी राहुल गांधी बिनबुडाचे, खोटे आणि भारतविरोधी वक्तव्य करत असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या विधानांमुळे प्रत्येक भारतीयाला लाज वाटत असल्याचा दावाही भाटिया यांनी केला. (Rahul Gandhi Mir Jafar Controversy)
गेल्या १२ वर्षांपासून देशात मजबूत आणि स्थिर सरकार कार्यरत आहे. मात्र, ही स्थिरता धोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप गौरव भाटिया यांनी केला.
राहुल गांधी यांना अपरिपक्व आणि भारतविरोधी संबोधत भाटिया यांनी त्यांची तुलना थेट 'भारताचे मीर जाफर' अशी केली.
परदेशी आकांकडून निर्देश घेतात का?
गौरव भाटिया यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संसदेचे प्रत्येक अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी परदेशात जातात, असा दावा करत ते म्हणाले की, राहुल गांधी परदेशी आकांकडून निर्देश घेण्यासाठी जातात का, असा प्रश्न उपस्थित होतो. (Rahul Gandhi Mir Jafar Controversy)
यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील पोस्टद्वारे राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी राहुल गांधी यांना भारतविरोधी नेता संबोधत टीका केली होती.
भारताची प्रतिमा मलिन करण्याचा ठरलेला पॅटर्न!
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सी. आर. केशवन यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. राहुल गांधी जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात, तेव्हा भारताची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप त्यांनी केला. (Rahul Gandhi Mir Jafar Controversy)
केशवन म्हणाले, "राहुल गांधी प्रत्येक परदेश दौऱ्यात आपल्या विषारी खोट्या विधानांद्वारे भारताची प्रतिमा मलिन करण्याचा धोकादायक पॅटर्न अवलंबतात." (Rahul Gandhi Mir Jafar Controversy)
भाजपच्या अन्य नेत्यांकडूनही टीका!
भाजपच्या तेलंगणा प्रदेशाध्यक्ष एन. रामचंद्र राव यांनीही राहुल गांधी यांच्या विधानांवर टीका केली. तर बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप करताना म्हटले की, भाजपविरोधातील राजकीय लढाई लढताना राहुल गांधी आता भारताचाच विरोध करू लागले आहेत.
राहुल गांधी यांच्या परदेशातील विधानांमुळे देशांतर्गत राजकीय वातावरण तापले असून, भाजप आणि काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा वेग आला आहे. (Rahul Gandhi Mir Jafar Controversy)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.