श्रीनगर (Latif Bhat Encounter Kashmir) : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी लतीफ भट याचा खात्मा केला. सीआरपीएफ चौकीवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या लतीफला बुधवारी, १८ नोव्हेंबर रोजी सुरक्षा जवानांनी चकमकीत ठार केले. कारवाईपूर्वी जवानांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्याशी संपर्क साधून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्याने आत्मसमर्पण करण्यास स्पष्ट नकार दिला.
जवानांनी त्याला, "आम्ही तुझ्यासोबत आहोत, अजूनही तुझ आयुष्य शिल्लक आहे," असे सांगितले. त्यावर लतीफने, "मला अल्लाहला भेटायचे आहे. मी खूप आनंदी आहे. मी आत्मसमर्पण करणार नाही," असे उत्तर दिले. (Latif Bhat Encounter Kashmir)
मशिदीत लपला होता दहशतवादी!
सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार, लतीफने उमर निसार दार याच्यासोबत मिळून ११ नोव्हेंबर रोजी नौपोरा अखरान येथील सीआरपीएफ चौकीवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले होते. तेव्हापासून हे दोघेही फरार होते. (Latif Bhat Encounter Kashmir)
१६ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी अखरानमधील लारू परिसरात दोन्ही दहशतवाद्यांना घेराव घातला. यावेळी झालेल्या चकमकीत उमर ठार झाला. मात्र, पायाला गोळी लागून जखमी झालेला लतीफ घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली. दोन दिवसांनंतर लतीफ देवसर परिसरातील जंगलपोरा गावातील एका मशिदीत लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली.
लतीफवर होते १५ लाखांचे बक्षीस!
लतीफची माहिती देणाऱ्यास पोलिसांकडून १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. २०२५ च्या सुरुवातीला तो घरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. पुढे पाकिस्तानस्थित दहशतवादी कार्यकर्ता सज्जाद गुल याने त्याला लष्कर-ए-तोयबा आणि त्याची सहयोगी संघटना टीआरएफमध्ये भरती केले. (Latif Bhat Encounter Kashmir)
लतीफने आशमुजी येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर कुलगाम येथील शासकीय पदवी महाविद्यालयात काही काळ शिक्षण घेतल्यानंतर त्याने सुतारकामाचा व्यवसाय सुरू केला होता.
दरम्यान, उमरने लतीफला तब्बल सहा महिने आश्रय दिला होता. सीआरपीएफ चौकीवर हल्ला करण्यापूर्वी या दोघांनी विविध परिसरांची पाहणीही केली होती. (Latif Bhat Encounter Kashmir)
सहा महिन्यांत लष्कर-ए-तोयबाचे चौथे कमांडर ठार!
गेल्या सहा महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे चार कमांडर सुरक्षा दलांच्या कारवाईत मारले गेले आहेत. यामध्ये लतीफ भट, झाकीर अहमद गनाई, यासिर आणि मूसा (आसिफ फौजी) यांचा समावेश आहे.
झाकीर अहमद गनाई याला दि. ८ जुलै २०२६ रोजी शोपियानमध्ये ठार करण्यात आले. यासिर दि. ४ सप्टेंबर रोजी ऑपरेशन अस्धारदरम्यान, तर मूसा (आसिफ फौजी) याला दि. ३० सप्टेंबर रोजी बडगाममधील ऑपरेशन शेरवालीदरम्यान कंठस्नान घालण्यात आले. (Latif Bhat Encounter Kashmir)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.