दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचे एक महिन्याचे वेतन

    17-Nov-2026   

NCP MLAs One Month Salary Donation
 
मुंबई (NCP MLAs One Month Salary Donation) : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी, मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान या वेतनाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते.(NCP MLAs One Month Salary Donation)
 
हीच अजितदादांनी दिलेली खरी शिकवण
 
शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देणे, हीच अजितदादांनी आपल्याला दिलेली खरी शिकवण आहे. दादांच्या याच विचारांचा वारसा पुढे नेत, शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी योगदान देणे, ही आपली सामूहिक जबाबदारी असून शेतकरी बांधवांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहणे, हाच यामागचा प्रामाणिक भाव असल्याचे यावेळी आमदारांनी स्पष्ट केले.(NCP MLAs One Month Salary Donation)
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर