मुंबई (Bhaskarrao Kulkarni Passes Away) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विविध जबाबदाऱ्यांवर काम केलेले सक्रिय कार्यकर्ते, सामाजिक समरसता मंचाचे माजी प्रांत उपाध्यक्ष, विश्व हिंदू परिषदेचे माजी विभाग संयोजक आणि पत्रकार भास्करराव यादवराव कुळकर्णी यांचे १६ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. बडनेरा नवी वस्ती येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बडनेरा येथील गांधी विद्यालय येथून भास्करराव मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांचे ते वडील होते. गेल्या दोन वर्षात भास्करराव कुळकर्णी अंथरुणाला खिळून होते. त्यांच्यामागे शिवराय कुळकर्णी यांच्यासह डॉ. अश्विनी अशोक थोडगे ही कन्या, स्नुषा, नातवंडे व बराच मोठा आप्तेष्ट चाहत्यांचा परिवार आहे. भास्कररावांनी आणीबाणी मध्ये मिसाबंदी म्हणून १८ महिने तुरुंगवास पत्करला होता.(Bhaskarrao Kulkarni Passes Away)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक भास्करराव कुळकर्णी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. संघ, विश्व हिंदू परिषद, सामाजिक समरसता मंच अशा विविध क्षेत्रात प्रतिकूलतेच्या काळात अतिशय सक्रियतेने त्यांनी काम केले. आणीबाणीच्या काळात १८ महिने तुरुंगवास त्यांनी भोगला. पत्रकारितेच्या क्षेत्रात सुद्धा आपला अमीट ठसा त्यांनी उमटविला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे सुपुत्र, आमचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि संपूर्ण कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.(Bhaskarrao Kulkarni Passes Away)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक