अमेरिकेच्या आकाशात विमानांचा ट्रॅफिक जॅम! १० हजारांहून अधिक उड्डाणे विस्कळीत; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

 
US Flight Disruptions November 2026
 
वॉशिंग्टन (US Flight Disruptions November 2026) : जगातील सर्वाधिक व्यस्त विमान वाहतूक व्यवस्थांपैकी एक असलेल्या अमेरिकेतील विमानसेवा शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी अनेक तास विस्कळीत झाली. हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील (Air Traffic Control) दूरसंचार व्यवस्थेत तांत्रिक बिघाड झाल्याने अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने (एफएए) देशभरातील विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली. या निर्णयामुळे हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले, अनेक उड्डाणांना विलंब झाला, तर काही विमाने पर्यायी विमानतळांकडे वळवण्यात आली.
 
या बिघाडाचा परिणाम सुमारे १५ लाख प्रवाशांवर झाल्याचा अंदाज विमान वाहतूक विश्लेषण कंपनी सिरियम ने व्यक्त केला आहे. शुक्रवारी १० हजारांहून अधिक उड्डाणांना विलंब झाला किंवा ती रद्द करण्यात आली. तसेच शेकडो विमानांचे मार्ग बदलण्यात आले. अमेरिकेच्या पूर्वेकडील वेळेनुसार रात्री ८.१५ वाजता एफएएने निर्बंध उठवले. मात्र, विमाने आणि वैमानिकांसह अन्य कर्मचाऱ्यांची नव्याने व्यवस्था करावी लागल्याने विमानसेवा तातडीने पूर्ववत होऊ शकली नाही. (US Flight Disruptions November 2026)
 
संचार यंत्रणेतील बिघाडामुळे देशव्यापी ग्राउंड स्टॉप
 
अमेरिकेच्या पूर्वेकडील वेळेनुसार शुक्रवारी दुपारी ३.३६ वाजण्याच्या सुमारास या तांत्रिक बिघाडाला सुरुवात झाली. देशभरातील एअर ट्रॅफिक कंट्रोल केंद्रे आणि टर्मिनल रडार अप्रोच कंट्रोल (TRACON) केंद्रांमध्ये दूरसंचार आणि रडारशी संबंधित अडचणी निर्माण झाल्या. विमानतळांदरम्यान प्रवास करणाऱ्या विमानांना दिशा आणि मार्गदर्शन देणाऱ्या एअर रूट ट्रॅफिक कंट्रोल केंद्रांवरही त्याचा परिणाम झाला.
 
प्रवाशांच्या आणि विमानांच्या सुरक्षिततेचा विचार करून एफएएने देशव्यापी 'ग्राउंड स्टॉप' लागू केला. या आदेशानुसार नवीन विमानांच्या उड्डाणांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली. मात्र, त्यावेळी आधीच हवेत असलेल्या ३,५०० हून अधिक विमानांना सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी उतरू देण्यात आले. (US Flight Disruptions November 2026)
 
अमेरिकेचे परिवहन मंत्री शॉन डफी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानांची सुरक्षित लँडिंग सुरू असताना रात्री ८ वाजेपर्यंत अमेरिकेच्या हवाई क्षेत्रातील विमानांची संख्या ४०० पेक्षाही कमी झाली होती. आपत्कालीन वैद्यकीय मदत, जीवनरक्षक औषधे आणि आवश्यक साहित्याची वाहतूक करणाऱ्या विमानांना तसेच कायदा अंमलबजावणी यंत्रणांच्या विमानांना विशेष परवानगी देण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला. (US Flight Disruptions November 2026)
 
जुन्या राउटर आणि स्विचमुळे संचार व्यवस्थेवर ताण
 
अमेरिकेचे परिवहन मंत्री शॉन डफी यांनी या बिघाडामागे देशातील जुनी हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणा असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, जुन्या संचार उपकरणांवर डेटाचा अतिरिक्त भार पडल्याने राउटर आणि स्विचमधून विसंगत माहिती पाठवली जाऊ लागली. परिणामी, विमान वाहतूक नियंत्रक आणि वैमानिक यांच्यातील संपर्क व्यवस्थेत अडथळे निर्माण झाले. (US Flight Disruptions November 2026)
 
पत्रकार परिषदेत बोलताना डफी यांनी सांगितले की, अमेरिकेच्या हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेत अजूनही जुन्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. काही ठिकाणी १९८० च्या दशकातील तांब्याच्या तारांवर आधारित दूरसंचार व्यवस्था कार्यरत आहे. जुन्या उपकरणांवर अतिरिक्त ताण आल्याने ही समस्या निर्माण झाली.
 
डफी यांनी इशारा दिला की, या जुन्या यंत्रणेचे आधुनिकीकरण केले नाही, तर भविष्यातही अशा प्रकारचे तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता आहे. (US Flight Disruptions November 2026)
 
हवेत असलेल्या विमानांचे काय झाले?
 
एफएएने देशव्यापी ग्राउंड स्टॉप लागू केला म्हणजे हवेत असलेल्या सर्व विमानांना तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्याचे आदेश दिले, असा त्याचा अर्थ होत नाही. या निर्बंधांचा मुख्य उद्देश नवीन विमानांना उड्डाण करण्यापासून रोखणे हा होता. आधीच हवेत असलेल्या विमानांना उपलब्ध रडार आणि संचार यंत्रणांच्या मदतीने सुरक्षितपणे मार्गदर्शन करण्यात आले. (US Flight Disruptions November 2026)
 
वैमानिक आणि हवाई वाहतूक नियंत्रक अशा परिस्थितींसाठी निश्चित केलेल्या सुरक्षा नियमांचे पालन करतात. विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी असलेला द्विमार्गी रेडिओ संपर्क पूर्णपणे तुटल्यास वैमानिकांना एफएएच्या एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन मॅन्युअलमधील मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी लागते.
 
अमेरिकेचे परिवहन सचिव शॉन डफी यांच्या माहितीनुसार, १३ नोव्हेंबर रोजी तांत्रिक बिघाडामुळे एफएएने उड्डाणांवर निर्बंध लागू केले, तेव्हा ३,५०० हून अधिक विमाने हवेत होती. या परिस्थितीत वैमानिक आणि हवाई वाहतूक नियंत्रकांनी विमानांना सुरक्षितपणे उतरवण्यासाठी निर्धारित प्रक्रियांचे पालन केले. डफी यांनी सांगितले की, रात्री ८ वाजेपर्यंत अमेरिकेच्या हवाई क्षेत्रातील विमानांची संख्या ४०० पेक्षाही कमी झाली होती. (US Flight Disruptions November 2026)
 
मात्र, एखाद्या विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रकांशी असलेला द्विमार्गी रेडिओ संपर्क तुटल्यास परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. अशा प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या (एफएए) एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन मॅन्युअल (AIM) मधील कलम ६-४-१ मध्ये मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांनुसार, वैमानिकांना १४ सीएफआर कलम ९१.१८५ चा संदर्भ दिला जातो. हवाई वाहतूक नियंत्रकांशी संपर्क तुटल्यास इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रूल्स (IFR) अंतर्गत विमानाचे संचालन कसे करावे, याबाबत या नियमात तरतुदी आहेत.
 
दृश्यमान हवामान परिस्थितीत संपर्क तुटल्यास वैमानिकांनी सुरक्षितपणे उड्डाण सुरू ठेवून लवकरात लवकर योग्य विमानतळावर उतरावे, अशी तरतूद आहे. मात्र, जवळच्या विमानतळावरच उतरणे बंधनकारक नसते. विमानाची सुरक्षितता आणि परिस्थितीचा विचार करून वैमानिक योग्य निर्णय घेऊ शकतात. (US Flight Disruptions November 2026)
 
याउलट, प्रतिकूल हवामान किंवा उपकरणांच्या मदतीने उड्डाण करण्याची परिस्थिती असल्यास वैमानिकांना ठरवून दिलेल्या मार्ग आणि उंचीचे नियम पाळावे लागतात. रेडिओ संपर्क तुटल्याचे दर्शवण्यासाठी वैमानिक ट्रान्सपॉन्डरवर ७६०० हा विशेष कोड वापरतात. त्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रक उपलब्ध पर्यायी संपर्क माध्यमांद्वारे वैमानिकांशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात.
 
१५ लाख प्रवासी प्रभावित; हजारो उड्डाणांना विलंब
 
या तांत्रिक बिघाडाचा परिणाम अमेरिकेतील अनेक विमानतळांवर झाला. त्यामुळे प्रवाशांना विमानांची उड्डाणे रद्द होणे, विलंबाने सुटणे तसेच काही विमानांचे अन्य विमानतळांकडे वळवण्यात येणे (डायव्हर्जन) अशा अडचणींचा सामना करावा लागला. सीएनएनच्या वृत्तानुसार, विमान वाहतूक क्षेत्रातील विश्लेषण करणाऱ्या सिरियम या कंपनीच्या अंदाजानुसार, या बिघाडामुळे सुमारे १५ लाख प्रवासी प्रभावित झाले. (US Flight Disruptions November 2026)
 
शुक्रवारी, संध्याकाळी ७.०५ वाजेपर्यंत किमान ८२७ विमानांचे मार्ग बदलण्यात आले होते. यापैकी ६७० विमाने त्यांच्या मूळ प्रस्थान विमानतळांवर परत पाठवण्यात आली, तर १५७ विमाने अन्य विमानतळांकडे वळवण्यात आली.
 
या बिघाडामुळे विमानतळांच्या पायाभूत सुविधांवरही ताण निर्माण झाला. वृत्तांनुसार, रोनाल्ड रीगन वॉशिंग्टन नॅशनल विमानतळावर अन्य ठिकाणांहून वळवण्यात आलेली विमाने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे या विमानतळावर आणखी विमाने उतरवण्यास मज्जाव करण्यात आला. (US Flight Disruptions November 2026)
 
जेटब्लू, युनायटेड एअरलाइन्स आणि अमेरिकन एअरलाइन्स यांसारख्या प्रमुख विमान कंपन्यांनी प्रवाशांना संभाव्य अडचणींबाबत सतर्क केले आहे. तसेच प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या विमानाच्या उड्डाणाची सद्यस्थिती तपासण्याचा सल्ला दिला आहे. जेटब्लूने शुक्रवारी होणारी उर्वरित देशांतर्गत उड्डाणे रद्द केली. मात्र, न्यूयॉर्कमधील जेएफके आणि बोस्टन येथून युरोपकडे जाणाऱ्या काही उड्डाणांना यातून सूट देण्यात आली. (US Flight Disruptions November 2026)
 
दरम्यान, आणखी काही उड्डाणे रद्द होण्याची शक्यता असल्याने शनिवारीही विमान कंपनीच्या कामकाजावर या बिघाडाचा परिणाम होऊ शकतो, असा इशारा जेटब्लूने दिला आहे.

पुढील काही दिवस विमानसेवा विस्कळीत राहण्याची शक्यता
 
एफएनएनने देशव्यापी ग्राउंड स्टॉप हटवला असला, तरी विमान वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागणार आहे. उड्डाणे रद्द झाल्यामुळे अनेक विमाने त्यांच्या नियोजित विमानतळांवर उपलब्ध नव्हती. वैमानिक, केबिन क्रू आणि इतर कर्मचाऱ्यांची नव्याने व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे शनिवार आणि त्यानंतरच्या काही दिवसांतही प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागू शकतो. (US Flight Disruptions November 2026)
 
दरम्यान, एफएनएन आणि संबंधित यंत्रणांकडून संचार व्यवस्थेतील बिघाडाचा तपास सुरू आहे. या घटनेत सायबर हल्ल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र, तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत, याचा तपास केला जात आहे.
 
अमेरिकेच्या हवाई वाहतूक नियंत्रण व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाचा मुद्दाही या घटनेमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. जुन्या उपकरणांऐवजी आधुनिक तंत्रज्ञान आणि अधिक सक्षम संचार व्यवस्था उभारण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याचे परिवहन मंत्री शॉन डफी यांनी स्पष्ट केले आहे. (US Flight Disruptions November 2026)





मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर