राहुल गांधींना मोदी फोबिया; फोन टॅपिंगचे आरोप निराधार आणि बालिश – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘उथळ पाण्याला खळखळाट फार’; प्रसिद्धीसाठी फेक नॅरेटिव्हचा आधार घेत असल्याची टीका

    14-Nov-2026
 
 
Eknath Shinde on Rahul Gandhi
 
मुंबई (Eknath Shinde on Rahul Gandhi): राहुल गांधी यांना सध्या ‘मोदी फोबिया’ने पछाडले असून, त्यांना उठता-बसता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच दिसतात. पंतप्रधानांचे नाव घेतल्याशिवाय त्यांची बातमीही होत नाही. त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी ते फोन टॅपिंगसारखे निराधार आणि बालिश आरोप करत आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
 
राहुल गांधी यांच्याकडे कोणताही ठोस मुद्दा, विकासाचे व्हिजन किंवा आरोपांच्या समर्थनार्थ पुरावा नाही. केवळ पुरावे असल्याचा दावा करायचा, हवेत तीर सोडायचे आणि दररोज नवे फेक नॅरेटिव्ह तयार करायचे, हाच त्यांचा उद्योग झाला आहे, अशी टीका शिंदे यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे केली. (Eknath Shinde on Rahul Gandhi)
 
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीची नवी शिखरे गाठत असताना विरोधी पक्षनेते मात्र हास्यास्पद विधानांमधून स्वतःचेच हसे करून घेत आहेत. स्वतःची बुडती राजकीय नौका वाचवण्यासाठी राहुल गांधी असे आरोप करत असल्याचे सांगत शिंदे यांनी ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ या म्हणीतून त्यांच्यावर एक्स। पोस्ट द्वारे निशाणा साधला. (Eknath Shinde on Rahul Gandhi)
 
 




संबंधित मजकूर