आदित्य बिर्ला कॅपिटलची मुंबईत गोल्ड लोन क्षेत्रात एंट्री; १०० वी शाखा सुरू!

पुढील तीन वर्षांत देशभरात १,००० हून अधिक शाखा सुरू करण्याचे लक्ष्य

 
 
Aditya Birla Capital Gold Loan
 
मुंबई (Aditya Birla Capital Gold Loan): आदित्य बिर्ला कॅपिटल कंपनीने देशातील १०० व्या समर्पित गोल्ड लोन शाखेचे उद्घाटन मुंबईतील सांताक्रूझ येथे केले. यासोबतच अंधेरी येथेही कंपनीने दुसरी शाखा सुरू केली आहे. आगामी तीन वर्षांत देशभरात १,००० हून अधिक शाखांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे.
 
आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या एनबीएफसी व्यवसायाने ऑगस्ट २०२६ मध्ये गोल्ड लोन क्षेत्रात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. मार्च २०२७ पर्यंत २०० ते ३०० समर्पित शाखा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. मात्र, व्यवसाय सुरू केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत १०० शाखांचा टप्पा गाठत कंपनीने विस्ताराच्या दिशेने वेगाने पावले टाकली आहेत. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत कंपनीच्या गोल्ड लोन व्यवसायाचे व्यवस्थापनाखालील मालमत्ता मूल्य (एयूएम) २०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. (Aditya Birla Capital Gold Loan)
 
महाराष्ट्र हे गोल्ड लोन व्यवसायासाठी महत्त्वाचे राज्य मानले जाते. ट्रान्सयुनियन सिबिलच्या एप्रिल २०२६ मधील अहवालानुसार, २०२५ मध्ये महाराष्ट्रातील सोनेतारण कर्ज वितरणात वार्षिक ४० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. देशातील एकूण गोल्ड लोन वितरणात महाराष्ट्राचा वाटा ५.८ टक्के होता. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील बाजारपेठेत विस्तार करण्यावर कंपनीचा भर आहे. (Aditya Birla Capital Gold Loan)
 
या शाखांचे उद्घाटन आदित्य बिर्ला कॅपिटलच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाखा मुळ्ये तसेच एनबीएफसीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. समर्पित शाखा, सुलभ कर्जप्रक्रिया आणि डिजिटल सुविधांच्या माध्यमातून ग्राहकांना सुरक्षित, पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. (Aditya Birla Capital Gold Loan)
 
यावेळी बोलताना विशाखा मुळ्ये यांनी सांगितले की, १०० व्या शाखेचा टप्पा गाठणे ही कंपनीसाठी महत्त्वाची कामगिरी आहे. ग्राहकांचा विश्वास आणि कंपनीची अंमलबजावणी क्षमता याचे हे प्रतीक आहे. आदित्य बिर्ला ब्रँडचा विश्वास, प्रत्यक्ष शाखांचे जाळे आणि तंत्रज्ञानाधारित सुविधा यांच्या माध्यमातून गोल्ड लोन क्षेत्रात मजबूत स्थान निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. (Aditya Birla Capital Gold Loan)
 
दरम्यान, आदित्य बिर्ला कॅपिटलच्या देशभरात एकूण १,८२२ शाखा असून, दोन लाखांहून अधिक एजंट्स आणि चॅनेल पार्टनर्सचे नेटवर्क आहे. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत कंपनीची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता १२.३४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली होती. कंपनीच्या एनबीएफसी व्यवसायाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत वार्षिक २६ टक्क्यांची वाढ होऊन ती १,७६,५५७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गोल्ड लोन क्षेत्रातील विस्तारामुळे कंपनीच्या कर्ज व्यवसायाला आणखी बळ मिळण्याची अपेक्षा आहे. (Aditya Birla Capital Gold Loan)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर