मुंबई (Aditi Tatkare Vanrai Bunds): हवामान बदल आणि वाढत्या तापमानामुळे जलसाठ्यांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढत असून, उपलब्ध पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता वर्षभराचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी आणि वन विभागाने समन्वय साधून गावागावांत वनराई बंधारे उभारावेत, रोजगार हमी योजना आणि ग्रामस्थांच्या सहभागातून जलसंधारणाची कामे सातत्याने राबवावीत, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळ निवारण उपाययोजनांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाणी अडविणे, जिरविणे आणि उपलब्ध जलसाठ्याचे संवर्धन करणे याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली. (Aditi Tatkare Vanrai Bunds)
तटकरे म्हणाल्या की, आगामी दोन वर्षे हवामानाच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर, जलसाठ्यांची क्षमता वाढविणे आणि लोकसहभागातून जलव्यवस्थापन करणे आवश्यक आहे. बंधारे आणि जलसाठ्यांमधील गाळ काढण्याची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. हा गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिल्यास शेतजमिनीची सुपीकता वाढण्यासोबतच जलसाठ्यांची पाणी साठविण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावित जलसंधारणाच्या कामांना तातडीने मंजुरी द्यावी, असेही त्यांनी सांगितले. (Aditi Tatkare Vanrai Bunds)
जलजीवन मिशनअंतर्गत ७० टक्के काम पूर्ण झालेल्या; मात्र उर्वरित कामांसाठी निधीची आवश्यकता असलेल्या योजनांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधावा, असे निर्देशही तटकरे यांनी दिले. दुष्काळ निवारणासाठी पुढील सात ते आठ महिने सर्व विभागांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन दरमहा आढावा बैठक घ्यावी. तसेच पाणीटंचाई कृती आराखड्यात दर तीन महिन्यांनी परिस्थितीनुसार आवश्यक बदल करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. (Aditi Tatkare Vanrai Bunds)
वाढत्या तापमानाचा परिणाम बालके, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्यावर होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. स्थानिक तापमान आणि परिस्थितीनुसार शाळा व अंगणवाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबांना अन्य जिल्ह्यांतही अंगणवाड्यांमधून पोषण आहार उपलब्ध व्हावा, यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Aditi Tatkare Vanrai Bunds)
बैठकीस खासदार गोवाल पाडवी, आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बालदिनानिमित्त राबविण्यात आलेल्या ‘एक दिवसाचे जिल्हाधिकारी’ या उपक्रमांतर्गत एक दिवसाच्या जिल्हाधिकारी झालेल्या आचल वसावे यांची उपस्थिती होती.
हवामान बदल आणि वाढत्या तापमानामुळे जलसाठ्यांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढत असून, उपलब्ध पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता वर्षभराचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी आणि वन विभागाने समन्वय साधून गावागावांत वनराई बंधारे उभारावेत, रोजगार हमी योजना आणि ग्रामस्थांच्या सहभागातून जलसंधारणाची कामे सातत्याने राबवावीत, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. (Aditi Tatkare Vanrai Bunds)
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळ निवारण उपाययोजनांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाणी अडविणे, जिरविणे आणि उपलब्ध जलसाठ्याचे संवर्धन करणे याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली. (Aditi Tatkare Vanrai Bunds)
तटकरे म्हणाल्या की, आगामी दोन वर्षे हवामानाच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर, जलसाठ्यांची क्षमता वाढविणे आणि लोकसहभागातून जलव्यवस्थापन करणे आवश्यक आहे. बंधारे आणि जलसाठ्यांमधील गाळ काढण्याची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. हा गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिल्यास शेतजमिनीची सुपीकता वाढण्यासोबतच जलसाठ्यांची पाणी साठविण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावित जलसंधारणाच्या कामांना तातडीने मंजुरी द्यावी, असेही त्यांनी सांगितले. (Aditi Tatkare Vanrai Bunds)
जलजीवन मिशनअंतर्गत ७० टक्के काम पूर्ण झालेल्या; मात्र उर्वरित कामांसाठी निधीची आवश्यकता असलेल्या योजनांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधावा, असे निर्देशही तटकरे यांनी दिले. दुष्काळ निवारणासाठी पुढील सात ते आठ महिने सर्व विभागांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन दरमहा आढावा बैठक घ्यावी. तसेच पाणीटंचाई कृती आराखड्यात दर तीन महिन्यांनी परिस्थितीनुसार आवश्यक बदल करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाढत्या तापमानाचा परिणाम बालके, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्यावर होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. स्थानिक तापमान आणि परिस्थितीनुसार शाळा व अंगणवाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबांना अन्य जिल्ह्यांतही अंगणवाड्यांमधून पोषण आहार उपलब्ध व्हावा, यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Aditi Tatkare Vanrai Bunds)
बैठकीस खासदार गोवाल पाडवी, आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बालदिनानिमित्त राबविण्यात आलेल्या ‘एक दिवसाचे जिल्हाधिकारी’ या उपक्रमांतर्गत एक दिवसाच्या जिल्हाधिकारी झालेल्या आचल वसावे यांची उपस्थिती होती. (Aditi Tatkare Vanrai Bunds)