मायक्रोसॉफ्टच्या Outlook आणि Microsoft 365 सेवा ठप्प! जगभरातील कंपन्यांचे कामकाज विस्कळीत!

 
Microsoft Outlook Microsoft 365 Outage
 
मुंबई (Microsoft Outlook Microsoft 365 Outage) : जगभरातील कोट्यवधी कार्यालयांच्या दैनंदिन कामकाजासाठी वापरल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या सेवांमध्ये गुरुवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी मोठा तांत्रिक बिघाड झाला. कंपनीची ई-मेल सेवा Outlook आणि Microsoft 365 चे सर्व्हर ठप्प झाल्याने हजारो वापरकर्त्यांना ई-मेल पाठवणे, प्राप्त करणे तसेच अकाउंटमध्ये लॉग-इन करताना अडचणींचा सामना करावा लागला. या आउटेजमुळे अनेक कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम झाला.
 
'डाउनडिटेक्टर'वर तक्रारींचा पाऊस
 
ऑनलाइन सेवांमधील बिघाडाची माहिती देणाऱ्या 'डाउनडिटेक्टर' या प्लॅटफॉर्मनुसार, अमेरिकेच्या पूर्वेकडील वेळेनुसार गुरुवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास Outlook संदर्भातील तक्रारी येण्यास सुरुवात झाली. काही वेळातच तक्रारींची संख्या झपाट्याने वाढली आणि ती १ लाखांहून अधिक झाली. (Microsoft Outlook Microsoft 365 Outage)
 
याशिवाय, Microsoft 365 सेवांमध्येही अडचणी येत असल्याच्या १५ हजारांहून अधिक तक्रारी वापरकर्त्यांनी नोंदवल्या. या तांत्रिक बिघाडाची पुष्टी मायक्रोसॉफ्टने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर केली. कंपनीच्या तांत्रिक पथकाकडून समस्येचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
 
मायक्रोसॉफ्टकडून आउटेजची पुष्टी
 
मायक्रोसॉफ्टच्या स्टेटस पेज अकाउंटवरून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेतील विविध कनेक्शन पद्धतींचा वापर करून Exchange Online मेलबॉक्समध्ये प्रवेश करताना वापरकर्त्यांना अडचणी येत असल्याच्या तक्रारींची कंपनी चौकशी करत आहे. (Microsoft Outlook Microsoft 365 Outage)
 
या समस्येबाबत अधिक माहिती Microsoft 365 एडमिन केंद्रामध्ये EX1550543 या कोडअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली होती. (Microsoft Outlook Microsoft 365 Outage)
 
सुरुवातीला अमेरिकेत समस्या; नंतर जागतिक परिणामाची शक्यता
 
सुरुवातीला हा तांत्रिक बिघाड अमेरिकेपुरता मर्यादित असल्याचे वाटत होते. मात्र, पुढे मायक्रोसॉफ्टने या समस्येचा परिणाम जगभरातील वापरकर्त्यांवर होऊ शकतो, असे स्पष्ट केले. (Microsoft Outlook Microsoft 365 Outage)
 
कंपनीच्या पायाभूत सुविधांमधील एका भागावर अनेक प्रदेशांतून मोठ्या प्रमाणात भार वाढल्याने कनेक्टिव्हिटीमध्ये अडथळे निर्माण झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. हा भार कमी करण्यासाठी आणि सेवा सुरळीत करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने आपल्या जागतिक नेटवर्कमधील कनेक्शन ट्रॅफिकचे पुनर्वितरण करण्यास सुरुवात केली. (Microsoft Outlook Microsoft 365 Outage)

मायक्रोसॉफ्टचे स्टेटस पेजही झाले ठप्प
 
विशेष म्हणजे, या आउटेजदरम्यान वापरकर्त्यांना सेवांच्या स्थितीबाबत माहिती देणारे मायक्रोसॉफ्टचे अधिकृत स्टेटस पेज (status.cloud.microsoft) देखील लोडिंग एररमुळे उघडत नव्हते. त्यामुळे वापरकर्त्यांना समस्येची अधिकृत माहिती मिळवण्यातही अडचणी आल्या.
 
मात्र, कंपनीने वापरकर्त्यांना Microsoft 365 एडमिन केंद्रामधील EX1550543 आणि MO1550821 या कोडअंतर्गत अपडेट तपासण्याचे आवाहन केले. (Microsoft Outlook Microsoft 365 Outage)





मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर