मुंबई(Nuclear Energy Awareness Rally) : अणुऊर्जेचे महत्त्व, सुरक्षितता आणि पर्यावरणपूरक फायदे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबईतून दुचाकी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (एनपीसीआयएल) एनपीसी कर्मचारी क्लबच्या वतीने शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी या पहिल्या अणुऊर्जा जनजागृती दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईतील अणुशक्तीनगर येथून खोपोलीपर्यंत सुमारे ६० किलोमीटरचा प्रवास या रॅलीद्वारे केला जाणार आहे.
अणुऊर्जा विभाग (डीएई), एनपीसीआयएल आणि भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (बीएआरसी) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अणुशक्तीनगर येथून या रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. एनपीसीआयएलचे कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा या उपक्रमात सहभाग असणार आहे. अणुऊर्जेविषयीची वस्तुनिष्ठ माहिती आणि जनहिताचे संदेश घेऊन हे सहभागी नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहेत. (Nuclear Energy Awareness Rally)
अणुऊर्जा ही सुरक्षित, विश्वासार्ह आणि पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर ऊर्जा आहे, याबाबत समाजात योग्य समज निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अणुऊर्जेविषयी असलेल्या गैरसमजुती दूर करून तिचे दीर्घकालीन महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. (Nuclear Energy Awareness Rally)
एनपीसी कर्मचारी क्लबच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या क्रीडा, सांस्कृतिक आणि मनोरंजनविषयक उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते. कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांमधील कलागुणांना वाव देण्याबरोबरच कर्मचारी कल्याणासाठीही क्लब विविध उपक्रम राबवितो. याच कार्याचा विस्तार म्हणून अणुऊर्जेविषयी जनजागृती करण्याचा पुढाकार क्लबने घेतला आहे. (Nuclear Energy Awareness Rally)
दरम्यान, एनपीसीआयएल आणि त्याच्या विविध घटक संस्थांकडून देशभरात अणुऊर्जेविषयी जनजागृतीसाठी व्यापक उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये अणुऊर्जा माहिती दालने, लघु अणुऊर्जा प्रदर्शने, जिल्हा विज्ञान केंद्रांमधील अणुऊर्जा प्रकल्पांच्या प्रतिकृती, फिरती प्रदर्शने, जनजागृती कक्ष, अणुऊर्जा प्रकल्पांना भेटी, व्याख्याने, चर्चासत्रे आणि समाजमाध्यमांवरील मोहिमांचा समावेश आहे. (Nuclear Energy Awareness Rally)
भारताने २०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. विकसित भारताच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या उद्दिष्टपूर्तीसाठी विज्ञाननिष्ठ आणि माहितीपूर्ण समाजाची निर्मिती महत्त्वाची ठरणार आहे. त्या दिशेने अणुऊर्जेविषयी नागरिकांची समज वाढविण्यासाठी ही पहिली दुचाकी जनजागृती रॅली महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. (Nuclear Energy Awareness Rally)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.