दिवाळीच्या रात्री टेक महिंद्राच्या माजी अधिकाऱ्याची निर्घृण हत्या; सीसीटीव्ही व्हिडीओ समोर, आरोपी म्हणाला, "दिवाळीच्या शुभेच्छा, विधवा."

 
Faridabad Tech Mahindra Former Executive Murder
 
फरीदाबाद (Faridabad Tech Mahindra Former Executive Murder) : हरियाणातील फरीदाबाद येथे टेक महिंद्रा कंपनीचे माजी आशिया प्रमुख परमजीत धनखड (वय ४५) यांच्या हत्येचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. धनत्रयोदशीच्या रात्री आरोपी मोनू शर्मा याने परमजीत यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात तब्बल ९ गोळ्या लागल्याने परमजीत यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हल्ल्यादरम्यान परमजीत यांची बहीण त्यांना वाचवण्यासाठी धावून आली असतानाही आरोपीने तिच्यासमोरच परमजीतवर गोळीबार सुरू ठेवला. वाचवायला आलेल्या बहिणीला आरोपीने परमजीतची पत्नी समजून म्हणाला, "दिवाळीच्या शुभेच्छा, विधवा."
 
मुलासमोरच परमजीत यांच्यावर गोळीबार
 
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आरोपी मोनू शर्मा फरीदाबादमधील सेक्टर २१सी येथील इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आला. त्याने परमजीत यांना बाहेर बोलावले. त्यावेळी परमजीत आपल्या मुलासोबत इमारतीबाहेर आले. पार्किंग परिसरात दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर मोनूने अचानक खिशातली बंदूक काढून परमजीत यांच्यावर गोळीबार सुरू केला. (Faridabad Tech Mahindra Former Executive Murder)
 
वडिलांवर गोळ्या झाडल्या जात असल्याचे पाहून त्यांचा मुलगा शौर्य घाबरून तेथून पळाला आणि आरडाओरडा करू लागला. दरम्यान, आरोपीने एकूण १५ राऊंड गोळ्या झाडल्याची माहिती आहे. त्यापैकी ९ गोळ्या परमजीत यांना लागल्या. (Faridabad Tech Mahindra Former Executive Murder)
 
जीव वाचवण्यासाठी धावले, पण आरोपीने पाठलाग केला
 
गोळ्या लागूनही परमजीत यांनी हार मानली नाही. ते जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या आतून बाहेरच्या दिशेने धावले. बाहेरचा दरवाजा बंद करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. मात्र, गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना दरवाजा बंद करता आला नाही. त्याचवेळी मोनूने शिवीगाळ करत त्यांच्यावर पुन्हा गोळ्या झाडल्या. (Faridabad Tech Mahindra Former Executive Murder)
 
विशेष म्हणजे, जखमी अवस्थेतही परमजीत यांनी आरोपीला पकडून त्याच्याकडील बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघेही जमिनीवर कोसळले. मात्र, मोनूने स्वतःची सुटका करून घेतली.

बहिणीसमोरच मॅगझिन बदलून पुन्हा गोळीबार
 
गोळीबाराचा आवाज आणि आरडाओरडा ऐकून परमजीत यांची बहीण त्यांना वाचवण्यासाठी घटनास्थळी धावली. ती परमजीत यांना उठवण्याचा प्रयत्न करत असतानाच आरोपीने बंदूकीचे मॅगझिन बदलले आणि पुन्हा गोळीबार केला. पोलिसांच्या माहितीनुसार, परमजीत यांना चार गोळ्या इमारतीबाहेर मारण्यात आल्या. (Faridabad Tech Mahindra Former Executive Murder)
 
याच वेळी आरोपीने परमजीत यांच्या बहिणीला परमजीतची पत्नी समजल्याचे सांगितले जाते. तिच्यासमोरच गोळीबार केल्यानंतर त्याने "दिवाळीच्या शुभेच्छा, विधवा. आज सर्वांना मारूण जाणार" अशी संतापजनक टिप्पणी करत पुन्हा गोळीबार सुरू केला.
 
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
 
या हत्येप्रकरणी आरोपी मोनू शर्मा पोलिसांच्या ताब्यात आहे. क्राइम ब्रँच सेक्टर ३० च्या गुन्हे शाखेचे पथक त्याची चौकशी करून पुरावे गोळा करत आहे. पोलिसांनी आरोपीकडून आतापर्यंत दोन बंदूक, तीन मॅगझिन आणि ६७ काडतुसे जप्त केली आहेत. (Faridabad Tech Mahindra Former Executive Murder)
 
चार वर्षांपासून दोन्ही कुटुंबांत वाद
 
पोलिसांच्या माहितीनुसार, परमजीत धनखड हे मूळचे हिसारचे रहिवासी होते. ते आपल्या कुटुंबासह फरीदाबादमधील सेक्टर २१सी येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहत होते. आरोपी मोनू शर्मा तिसऱ्या मजल्यावर राहत असून तो स्क्रॅप व्यवसाय करतो. दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या चार वर्षांपासून वाद सुरू होता. (Faridabad Tech Mahindra Former Executive Murder)
 
मोनू शर्मा जर्मन शेफर्ड कुत्रा घेऊन आल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये वादाला सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. आरोपीचा नोकर कुत्र्याला परमजीत यांच्या घरासमोर शौचास नेत असल्याच्या कारणावरून अनेकदा वाद झाला होता. त्यानंतर कार पार्किंग आणि जागेच्या वापरावरूनही दोन्ही कुटुंबांमधील वाद वाढत गेला. (Faridabad Tech Mahindra Former Executive Murder)
 
पार्किंगच्या वादानंतर हत्येचा कट?
 
धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी परमजीत यांचा मुलगा शौर्य आणि मोनू शर्मा यांच्यात पार्किंगचा गेट तोडण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. यावेळी मोनूने शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर या प्रकरणी अनखीर पोलीस चौकीत तक्रार देण्यात आली होती.
 
पोलिसांच्या चौकशीत मोनू शर्माने पोलीस चौकीत परमजीत यांच्या साथीदारांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा केला आहे. याच रागातून त्याने रात्री परमजीत यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून सीसीटीव्ही फुटेजसह अन्य पुराव्यांची तपासणी सुरू आहे. (Faridabad Tech Mahindra Former Executive Murder)





मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर