वॉशिंग्टन (Nvidia CEO Jensen Huang Independent Investigation) : जगातील आघाडीची चिप निर्मिती कंपनी एनव्हिडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. चिनी महिला व्यावसायिक ॲलिस हुआंग यांच्याशी असलेल्या कथित प्रेमसंबंधांमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. या चौकशीसाठी अमेरिकेतील न्यूयॉर्कस्थित 'वॅचटेल, लिप्टन, रोझेन अँड कॅट्झ' या नामांकित विधी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.
ॲलिस हुआंग यांच्याशी असलेल्या कथित जवळिकीमुळे अमेरिकी सुरक्षा यंत्रणांमध्ये चिंता निर्माण झाल्याचे सांगितले जाते. चीनच्या गुप्तचर यंत्रणेशी त्यांचे संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या कथित संबंधांमुळे कंपनीची संवेदनशील माहिती किंवा प्रगत एआय चिप्सशी संबंधित गोपनीय माहिती धोक्यात आली होती का, याची चौकशी केली जाणार आहे. (Nvidia CEO Jensen Huang Independent Investigation)
एनव्हिडियाच्या संचालक मंडळाकडून स्वतंत्र तपास
या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेली 'वॅचटेल' ही अमेरिकेतील प्रतिष्ठित विधी संस्था आहे. ही संस्था एनव्हिडियाच्या संचालक मंडळाला तपासात कायदेशीर आणि व्यावसायिक मार्गदर्शन करणार आहे. (Nvidia CEO Jensen Huang Independent Investigation)
संस्थेने दिलेल्या निवेदनानुसार, या स्वतंत्र चौकशीचे नेतृत्व जून एच. किम करणार आहेत. ते या संस्थेचे भागीदार असून, न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्ह्याचे माजी प्रभारी अमेरिकी ॲटर्नी म्हणून त्यांनी काम केले आहे. या प्रकरणातील आरोप, कंपनीच्या अंतर्गत प्रक्रिया आणि संभाव्य सुरक्षा धोके यांची तपासणी त्यांच्या नेतृत्वाखाली केली जाणार आहे.
कोण आहेत जून एच. किम?
जून एच. किम हे प्रामुख्याने न्यायालयीन खटले आणि तपासाशी संबंधित प्रकरणे हाताळतात. यापूर्वी त्यांनी न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्ह्यात प्रभारी अमेरिकी ॲटर्नी म्हणून काम पाहिले आहे. (Nvidia CEO Jensen Huang Independent Investigation)
२०२१ मध्ये न्यूयॉर्कच्या ॲटर्नी जनरल लेटिशिया जेम्स यांच्या कार्यालयाशी संबंधित चौकशी प्रक्रियेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तत्कालीन गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांच्या चौकशीतही ते साहाय्य करत होते . (Nvidia CEO Jensen Huang Independent Investigation)
तपासात सहकार्य करण्याचे जेनसेन हुआंग यांचे आश्वासन
एनव्हिडियाने दिलेल्या माहितीनुसार, जेनसेन हुआंग यांनी या स्वतंत्र चौकशीला पूर्ण पाठिंबा दर्शवला असून तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे, चीनने हेरगिरीसंदर्भातील आरोप फेटाळून लावले आहेत. या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या ॲलिस हुआंग यांनी अद्याप याबाबत सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, एनव्हिडिया ही जागतिक एआय उद्योगातील अत्यंत महत्त्वाची कंपनी असल्याने या चौकशीकडे तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. कंपनीची संवेदनशील माहिती लीक झाली आहे का किंवा तिच्या व्यावसायिक निर्णयांवर बाह्य प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाला आहे का, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. (Nvidia CEO Jensen Huang Independent Investigation)