नवी दिल्ली (Delhi NCR Pollution Work From Home) : वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी वायुगुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (CAQM) महत्त्वाचे प्रतिबंधात्मक उपाय जाहीर केले आहेत. त्यानुसार, दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (NCR) ५ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत परिसरात धूळ निर्माण करणारी पाडकामे आणि बाहेरील बांधकामांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच, सरकारी व खासगी कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्के कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची परवानगी असेल. उर्वरित कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागणार आहे.
नोव्हेंबरमध्ये प्रदूषण वाढण्याची शक्यता; आयोगाचा प्रतिबंधात्मक निर्णय
दिल्ली-NCR मध्ये विशेषतः नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मध्यापर्यंत वायुप्रदूषणाची पातळी वाढत असल्याचे मागील काही वर्षांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. २०१८ ते २०२५ या कालावधीतील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाच्या (AQI) आकडेवारीनुसार, काही दिवसांमध्ये प्रदूषणाची पातळी 'गंभीर' आणि 'अतिगंभीर' श्रेणीपर्यंत पोहोचली होती. (Delhi NCR Pollution Work From Home)
वाहनांचे उत्सर्जन, औद्योगिक प्रदूषण, शेतीतील अवशेष जाळणे आणि जैविक इंधन जाळल्यामुळे होणारे उत्सर्जन यांचा प्रदूषणात मोठा वाटा असतो. त्यातच कमी वाऱ्याचा वेग, वातावरणातील हवेचे कमी अभिसरण आणि प्रदूषक कण हवेतच साचून राहण्यास अनुकूल हवामान यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होते.
या पार्श्वभूमीवर प्रदूषणाची पातळी वाढण्यापूर्वीच उत्सर्जन कमी करण्यासाठी आयोगाने हे प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Delhi NCR Pollution Work From Home)
बांधकाम आणि पाडकामाच्या कामांवर निर्बंध
आयोगाच्या निर्देशानुसार, ५ ते २० नोव्हेंबरदरम्यान संपूर्ण NCR क्षेत्रात धूळ निर्माण करणारी पाडकामे आणि बाहेरील बांधकामे प्रतिबंधित असतील. महामार्ग, रस्ते, उड्डाणपूल, ओव्हरब्रिज, वीजवाहिन्या, पाइपलाइन आणि दूरसंचार प्रकल्पांसारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या कामांनाही हे निर्बंध लागू असतील.
मात्र, काही अत्यावश्यक आणि महत्त्वाच्या प्रकल्पांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. यामध्ये रेल्वे, मेट्रो सेवा, विमानतळ, आंतरराज्यीय बस स्थानके, रुग्णालये, पाणीपुरवठा आणि स्वच्छता व्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षणाशी संबंधित कामे तसेच राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. (Delhi NCR Pollution Work From Home)
सरकारी आणि खासगी कार्यालयांत ५० टक्के उपस्थिती
प्रदूषण नियंत्रणासाठी कार्यालयीन उपस्थितीबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली तसेच गुरुग्राम, फरीदाबाद, सोनीपत, गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगर या जिल्ह्यांतील सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये जास्तीत जास्त ५० टक्के कर्मचारी प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहू शकतील. उर्वरित कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. (Delhi NCR Pollution Work From Home)
मात्र, ज्या औद्योगिक आस्थापनांमध्ये किंवा अत्यावश्यक सेवांमध्ये वर्क फ्रॉम होमची व्यवस्था करणे शक्य नाही, त्यांना या नियमातून सूट देण्यात आली आहे.
२० नोव्हेंबरपर्यंत उपाययोजनांची अंमलबजावणी
दिल्ली-NCR मधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि प्रदूषणाची पातळी आणखी वाढू नये, यासाठी हे उपाय मर्यादित कालावधीसाठी लागू करण्यात आले आहेत. आयोगाने NCR राज्य सरकारांच्या संबंधित विभागांना आणि दिल्ली सरकारला या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. नोव्हेंबरमधील प्रदूषणाच्या संभाव्य वाढीवर नियंत्रण ठेवणे आणि प्रदूषकांचे उत्सर्जन कमी करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. (Delhi NCR Pollution Work From Home)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.