मुंबई (Nalasopara Minor Assault Case) : नालासोपारा पूर्व परिसरात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याची आणि ही घटना उघड केल्यास तिचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी दोन धर्मांध मुस्लिम जिहादी भावांना अटक केली आहे.
पेल्हार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआर कॉपीनुसार, ही घटना २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळेत घडली. गावदेवी मंदिराजवळील एका कापडाच्या दुकानात अमन नतीफ शेख आणि त्याचा भाऊ अरबाज शेख यांनी यांनी १५ वर्षीय मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास तिचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या आईला पाठवण्याची तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी मुलीला दिली होती.(Nalasopara Minor Assault Case)
पीडित अल्पवयीन मुलीचा असा आरोप आहे की, या सर्व प्रकरणात आरोपींच्या कुटुंबीयांचापण सहभाग होता. त्यांनी पीडितेचे ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न केला. लग्न करण्यास जबरदस्ती केली जात होती. बॉलिवूडचे उदाहरण देत, दोन वेगवेगळ्या धर्मांत लग्न होऊ शकतात म्हणून आरोपींच्या कुटुंबीयांनी पीडितेला फूस लावण्याचही प्रयत्न केला.
या प्रकरणी ३० ऑक्टोबर रोजी उशिरा संध्याकाळी पेल्हार पोलीस ठाण्यात दोन्ही जिहाद्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ६५(१), ७०(२), ३५१(२) आणि पॉक्सो कायदा २०१२ मधील कलम ४ आणि ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पेल्हार पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केली.(Nalasopara Minor Assault Case)
स्थानिक प्रशासनाने वेळीच योग्य कारवाई केली नाही, तर हिंदू समाजासोबत अशा गोष्टी वारंवार होत राहणार. नालासोपारा परिसरात घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पीडित परिवार जेव्हा पोलीस प्रशासनाकडे तक्रार नोंदवण्यासाठी जातो तेव्हा एफआयआर करून घेतला जात नाही. मग पीडित परिवार हिंदुत्ववादी संघटनांकडे मदत मागण्यासाठी येतो. त्यानंतर संघटनेचे कार्यकर्ते जेव्हा पोलीस प्रशासनाला जाऊन भेटतात, तेव्हाच तक्रार दाखल होते; हे चुकीचे आहे. संघटना म्हणून आम्हाला जर पाऊल उचलायची वेळ येत असेल, तर आम्ही पीडित परिवाराला योग्य न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक